Tips: How to take care of warm clothes or sweaters Esakal
स्वेटर किंवा गरमच्या कपड्यांची काळजी कशी घ्यावी? (Tips to take care of warm clothes or sweaters?)-
थंडीच्या दिवसात (Winter Season) शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी आपण स्वेटर किंवा गरम कपडे वापरतो. परंतु गरम कपड्यांची काळजी घेणं सोपं नाही. गरम कपड्यांच्या बाबतीत एक समस्या असते ती म्हणजे ते एक दोन वेळा धुतले की, ते आकसू लागतात आणि त्यांचा रंग फिकट होऊ लागतो. जर तुम्हाला गरमचे कपडे जास्त दिवस नव्या सारखे ठेवायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी खास ट्रिक्स सांगणार आहोत.
1. गरमचे कपडे रोज रोज धुवू नका (Don't wash warm clothes every day)- गरमचे कपडे पुन्हा पुन्हा धुतल्यामुळे त्यांची चमक कमी होते. या कपड्यांना शक्यतो एक दोन आठवड्याच्या अंतराने धुवावेत.2. गरम कपडे असे धुवा (How to wash warm clothes?)- खूप गरमचे कपडे असे असतात, जे धुतल्याने खराब होतात. गरमचे कपडे धुण्यापूर्वी ते कपडे घरी धुता येऊ शकतात का, याची खात्री करावी. 3. डिटर्जंटचा वापर (Use of detergent)- बऱ्याचदा खराब दर्जाचं डिटर्जंट वापरल्यामुळे स्वेटर किंवा गरमचे कपडे लवकर खराब होतात. गरमचे कपडे धुण्यासाठी नेहमी माइल्ड डिटर्जंटचा (Mild Detergent) उपयोग करा. 4. तुरटीचा वापर (Use of alumn) - गरम कपडे साफ करतेवेळी पाण्यात तुरटी टाका. तुरटीमुळे गरमच्या कपडे आकसणार नाहीत.5. गरमचे कपडे रगडू नका (Do not rub warm clothes)-
गरमच्या कपड्यांना नव्यासारखे ठेवायची असतील तर त्यांना जास्त रगडू नका. जास्त रगडल्यामुळे गरमचे कपडे फिकट पडू लागतात6. गरमचे कपडे धुतल्यानंतर कडक उन्हात सुकवू नका. उन्हात सुकायला घालताना कपडे उलटे करावेत.
6. बरेच कपडे धुतल्यानंतर आकसतात. अशावेळी ते कडक वाटतात. त्यापासून वाचण्यासाठी कपड्यांना धुतेवेळी डिटर्जंटमध्ये अर्धा कप व्हिनेगार टाका.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.