Tips on how to deal with failure Esakal
सध्याचं युग हे स्पर्धेचं युग (Age of Competiton) आहे. स्पर्धा म्हटली की हार-जीत (Win-Loss) आलीच. जिंकलो तर आनंद साजरा (Celebrate Win)करायला हवा आणि हरलो तर त्यामधून शिकायला (Learn from Defeat) हवं. शेवटी या स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचं कारण आयुष्य अनेक संधी (Opportunity) देत असतं. अनेक लोक पराभवानं खचून जातात. त्यांना नैराश्य येतं. परंतु जे लोक परिस्थितीचा सामना धैर्याने करतात, त्यांना यश (Success) मिळतंच. जरी यश मिळालं नाही तरी त्यांच्या धैर्याला लोक सलाम करतात. या स्पर्धेच्या युगात तग धरून कसं राहायचे याबद्दल आज आपण जाणून घेऊया. (Tips on how to deal with failure)
1. वर्तमानकाळ अटळ आहे (Live in Present)- बरेच लोक भविष्याच्या चिंता करत असतात. परंतु त्याचवेळी ते विसरतात की आज आपण जे करतोय त्याचीच फळे आपल्याला भविष्यात चाखायला मिळणार आहेत. वर्तमानकाळातील अडचणींपुढे हार मानून काही होणार नाही. तुम्हाला परिस्थिती स्वीकारून त्यानुसार स्वतःला पावले टाकायला हवीत. 2. व्यक्ती आणि परिस्थिती यांचा आहे असा स्वीकार करा (Accept the people and Situation)- आपण बऱ्याचदा आपल्या परिस्थितीवर किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांवर नाराज असतो. परंतु ही परिस्थिती आपण बदलू शकत नाही. आपल्या सानिध्यात असलेल्या लोकांना टाळणं शक्य नसल्यास त्यांचा स्वभाव स्वीकारून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायला हवं. 3. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग (Focus on Your Work)- आपण कोणतंही काम करताना आपल्या मनात हा विचार असतो की लोक काय म्हणतील. या विचारातच आपण आपल्या अनेक कल्पनांवर काम करत नाहीत. भविष्यात त्याचपद्धतीच्या कल्पनेवर कोणीतरी दुसरा काम करतो आणि तो यशस्वी होतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न चालू ठेवा.4. मेहनत करा (Hardwork)- मेहनत हेच यशाचं गमक आहे. अगदी कमी लोक असतात, जे नशिबाच्या जीवावर यशस्वी होतात. पण यश करणाऱ्याला त्याच्या प्रयत्नाचं फळ मिळतंच.5. इतरांना मदत करा (Help to Other) - समाजाला पुढे जायचं असेल तर एकमेकांना सहकार्य करत पुढे गेले पाहिजे. अडचणीच्या काळात एकमेकांना साथ द्यायला हवी. तरच समाज पुढे जाईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.