स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०. ५ रुपये प्रति सिलिंडर होती. ती आता तब्बल ९०० रुपयांपर्यंत गेली आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात सामान्य नागरिकांना महागाईच्या काळात घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. गॅसचेदर दिवसेंदिवस वाढतचे आहे पण त्यावर सध्या तरी गॅस जपून वापरणे हा एकच उपाय आहे. म्हणूनच महागाईच्या काळात घरगूती सिलेंडर गॅस वाचविण्याच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा :
स्वयंपाक करताना धातूच्या विशेषकरून स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा. आपल्याकडे कित्येक लोक मातीची किंवा इतर भांड्याचा वापर करतात. धातुचे भांडे उष्णेचा उत्तम संवाहक असतो हे लक्षात ठेवा. मातीचे भांडे जास्त गॅस वापरतात पण धातूच्या भांड्यांना कमी गॅस लागतो. गॅस जळताना पिवळ्या रंगाचा असू नये :
जर तुमचा गॅस जळताना निळ्या रंगाचा दिसत असेल तर गॅसचा बर्नर नीट वापरला जात नाहीये हे ध्यानात घ्या. जर गॅस बर्नर नीट बसविल्यानंतरही असे होत असेल तर एखाद्या कुशल तांत्रिक कारागीरला दाखवून दुरुस्थ करून घ्या. पिवळ्या रंगाची आग म्हणजे गॅस वाया जात आहे. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या गॅस जास्त वापरला जाईल. निळ्या रंगाची किंवा रंग नसलेली आग म्हणजे तुमचा गॅस व्यवस्थित वापरला जात आहे.
रुंद भांड्याचा वापर करा :
रुंद भांड्याचा वापर केल्याने गॅसची बचत होते हे तुम्हाला माहीत आहे का? रुंद भांड्याचा पृष्ठभाग मोठा असल्याने अन्न शिजविण्याचा वेळ कमी होतो. तसे रुंद भांडी गॅस पूर्णपणे कव्हर करतात त्यामुळे गॅस व्यवस्थित वापरला जातो आणि गॅसची बचत होते. तसेच तुम्ही अशा भांड्यावर झाकण ठेवले तर आणखी गॅस वाचतो.आधी भिजवा मग शिजवा : जर तुम्ही डाळ, चना, छोले, राजमा, अशा भाज्या बनविताना त्यांना आधी भिजत घाला, त्यामुळे शिजविताना कमी वेळ लागतो आणि गॅसची बतक होते. कित्येक लोक गोष्टी शिजविण्यासाठी मोठ्या आचेवर गॅस ठेवतात. त्यामुळे गॅस वाया जातो आणि भांड्यांचेही नुकसान होते.
भांड्यावर झाकण ठेवा :
स्वंयपाक करतना शक्य असेल तेव्हा भांडे उघडे ठेवू नका. अन्न शिजिवताना त्यावर झाकण ठेवा.भांड्यावर झाकण ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची बचत होते. जास्तीत जास्त कुकरचा वापर करा. त्यामुळे गॅसची बचत होईल. फ्रिजमधून काढल्यानंतर लगेच अन्न शिजवू नका :
फ्रिजमधून काढलेले पदार्थ किंवा बाजारातून आणलेले थंड पदार्थ थेट गॅसवर ठेवून शिजवू नका. या पदार्थांना घरातील तापमाननुसार होईपर्यंत वाट पाहा. या पदार्थांचे तापमान कमी झाल्यानंतरच अन्न शिजविण्यासाठी वापरा, तोपर्यंत गॅसवर ठेवू नका. जर तुम्ही असे केले नाही तर बर्फामुळे घट्ट झालेले पदार्थांचे तापमान कमी होण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो. अन्न शिजविताना गॅस कमी ठेवा
जर तुम्ही पाणी किंवा दूध गॅसवर गरम करत असाल आणि जेव्हा त्याला उकळी फुटते त्याचवेळी गॅस कमी आचेवर ठेवा , त्यामुळे कमी गॅस वापरला जातो. अन्न शिजवितानाही तुम्ही असे करू शकता. कित्येक लोक कमी वेळात अन्न शिजविण्यासाठी गॅस मोठ्या आचेवर ठेवतात त्यामुळे गॅस वाया जातो आणि भांड्याचे नुकसान देखील होते
अन्न शिजविताना जास्त गॅस वापरू नका
स्वयंपाक करताना भांडे आणि तवा गरम करताना गॅस मोठ्या आचेवर ठेवा. भांडे गरम झाले की मध्यम किंवा कमी आचेवर ठेवा. भांड गरम करण्यासाठी जेवढी उष्णता लागते तेवढी अन्न शिजविण्यासाठी लागत नाही. योग्य प्रमाणात पाणी म्हणजे गॅसची बचत
गॅसवर भांडे ठेवण्यापूर्वी धुतेले भांडे सुकवा कारण भांडे सुकविण्यासाठी विनाकारण गॅस वाया जातो जो वाचविला जाऊ शकतो. अन्न शिजविताना जास्त पाणी वापरू नका. पाणी जास्त असल्यास ते आटविण्यासाठी जास्त गॅस वापरला जातो. त्यामुळे तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाण ठेवून वाचवू शकता. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.