प्रत्येक ऋतूनुसार आपली फॅशन बदलत असते किंवा ती बदलावीच लागते. सध्याची फॅशन पूर्णपणे बदलली आहे, एक काळ असा होता की लोक कोणतेही कपडे घालत असत. त्यांनी त्यावेळी कपड्यांच्या मॅचिंगकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या फॅशनकडे पाहिले नाही. परंतु असे म्हणतात की बदल हा जीवनाचा नियम आहे आणि फॅशनच्या बाबतीतही हा नियम बदलला आहे. आपल्याला बाजारातही चांगल्या ब्रँडचे अनेक फॅशनेबल कपडे सहज सापडतील. याशिवाय हंगामानुसार फॅशन ट्रेंडही बदलतात. जसे की, उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्येही फॅशन ट्रेंड वेगवेगळे असतात. त्याप्रमाणेच, या पावसाळ्यात आपण वेगवेगळ्या फॅशन ट्रेंडसुध्दा फॉलो करू शकता. चला तर मग त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
क्रॉप्ड पँट्स:
तुम्ही पावसाळ्यात ट्राऊजर बिंदास वापरू शकता. कारण आता फॅशन मध्ये हा ट्रेंड आला आहे ‘क्रॉप्ड पँट्स’जी तुम्हाला ट्रेंडी आणि कम्फर्टेबल बनवेल.डेनिम बेल बॉटम्स:
आजकाल जीन्स वापरणारा जवळजवळ प्रत्येक व्यक्ती तुम्ही पाहात असाल. जीन्स प्रत्येकाला क्लासिक लुक देतेच. या पावसाळ्यात तुम्ही डेनिम बेल बॉटम्स घेऊ शकता. आपल्याला क्लासिक रेट्रो लुक देण्यासाठी योग्य ठरेल.हेअर स्टाइल :
पावसाळ्यात फिशटेल, साइटबँड किंवा हाय पोनीटेल नक्की ट्राय करा. वेगळ्या हेअर स्टाइल्स करून घ्या. पावसाळ्यात लहान केस तर आणखीन आकर्षक वाटतील.हँडबॅग्स :
पावसाळ्यात वाटरप्रूफ हँडबॅग्स कॅरी करायला खूप बरे पडते. त्यामुळे कुठेही आणि कधीही वाटरप्रूफ हँडबॅग्स वापरु शकता. पावसाळ्यात वाटरप्रूफ हँडबॅग्समध्येही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.हलका मेकअप:
या ऋतूत हलका मेकअप करावा. जी सौंदर्यप्रसाधने तुम्ही वापराल ती वॉटरप्रूफ असल्याची खात्री एकदा करून घ्या.नेलआर्ट डिझाइन :
नेल आर्ट करतानासुद्धा तुम्ही काही मान्सून स्पेशल डिझाइन्स करून पाहू शकता. यात तुम्ही छत्री, पाऊस, ढग अशा पद्धतीचं नेल आर्ट करू शकता.कलरफुल शेड्स:
या पावसाळ्यात तुम्ही कलरफुल शेड्सचे कपडे घालू शकता कारण ते खूप ट्रेंडमध्ये आहेत. या शेड्स आपल्या लूकला सर्वात वेगळ्या आणि सर्वोत्कृष्ट लूक देतील.फूटवेयर:
पावसाळ्यातही फॅशन जपण्यासाठी प्लॅस्टिक आणि रबरापासून बनलेल्या चपलांना पावसाळ्यात प्राधान्य दिले जाते. प्लेन कलर्ससोबतच फ्रेश, ब्राईट, कॉन्ट्रास्ट, मल्टिकलर्सच्या चपला तरुणाईचे आकर्षण ठरले आहे.ज्वेलरी:
पावसाळ्यात घालायच्या दागिन्यांची निवडही नीट करावी. नाही तर दागिन्यांचा रंग जाणं, ते दागिने अंगाला लागून त्वचेला त्रास होणं असे प्रकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात कमीत कमी दागिने घाला. वॉटरप्रूफ, चांगला दर्जा असलेले दागिने घाला.शॉर्ट स्कर्ट:
काही काळापूर्वी, शॉर्ट स्कर्ट खूप वापरले जायचे आताही काही प्रमाणातच वापर केला जात आहे, परंतु यावर्षी पावसाळ्यात पुन्हा हा ट्रेंड सुरु झाला आहे. शॉर्ट स्कर्ट हे आरामदायक आहे आणि हे एक क्लासी लूक देते. तर तुम्ही ते कॅरी करु शकता.श्रग:
या पावसाळ्यात तुम्ही सोबत श्रग कॅरी करु शकता, हे तुम्हाली एक वेगळा लूक देण्यासाठी कामी येईल. तुम्हाला ट्रेंडी लुक मिळवायचा असेल किंवा कॅज्युअल लुक ठेवायचा असेल तर हे श्रग तुम्हाला दोन्ही लूक देऊ शकतो.फॅशन बदलते:
प्रत्येक ऋतूनुसार आपली फॅशन बदलत असते किंवा ती बदलावीच लागते. त्याप्रमाणे पावसाळ्यातही फॅशन ट्रेंड बदलतातफॅशनेबल छत्री :
काही वर्षांपूर्वीच्या काळ्या आणि फुला-फुलांच्या छत्र्यांची जागा आता फॅशनेबल डिझाइनने घेतली आहे. नुसतीच डिझाइन नाही तर सध्या गडद रंगाच्या छत्र्यांची चांगलीच रेलचेल सुरु झाली आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.