Neeraj Chopra 6 Instagram
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात नीरज चोप्रानं इतिहास रचला. नीरजने सर्वात लांब भाला फेकत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलं.
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या २३ वर्षीय नीरजला लहानपणी मात्र लठ्ठपणामुळे काही समस्यांना समाोरं जावं लागलं.
दररोज घी-मख्खन-मलई खाऊन वयाच्या १३ वर्षी नीरजचं वजन ८० किलोहून अधिक झालं होतं.
२०११ मध्ये नीरजचे काका भीम चोप्रा यांनी त्याला पानीपत स्पोर्ट्स स्टेडियम जिम्नॅशिअममध्ये दाखल केलं.
"नीरजच्या लठ्ठपणामुळे त्याला अनेकजण चिडवायचे. त्यामुळे त्याचं वजन कमी करण्यासाठी मी त्याला जिमला नेलं", असं भीम चोप्रा 'इंडियन टुडे इन.'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
जिम सेशन संपल्यानंतर कुटुंबीयांच्या नकळत नीरज भालाफेकचं प्रशिक्षण घेऊ लागला.
आंतरजिल्हा स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा वर्तमानपत्रात नीरजचा फोटो झळकला, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या भालाफेकच्या आवडीबद्दल समजलं.
"भालाफेक हा काही खेळ असतो का, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडला होता", असं त्याचे काका भीम चोप्रा यांनी सांगितलं.
2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. 20 वर्षांखालील स्पर्धेत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.