लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा विधी असतो आणि त्यानंतरच हनिमून हे नवविवाहित जोडप्यांसाठी सर्वांत सुंदर क्षण असतात. आपलं हनिमून यादगार व्हावं, असं सर्वांनाच वाटतं. म्हणूनच हनिमून लोकेशन निवडताना सर्वजण जागरूक असतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि स्वस्त अशा हनिमून डेस्टिनेशन्सची माहिती देणार आहोत.
केरळ- केरळला पूर्वेचं व्हेनिस समजलं जाते. केरळमध्ये वर्षभर पर्यटक येत असतात. येथील हाऊसबोटचा आनंद घ्यायला लोकांना आवडतं. याशिवाय चहाचे मळे, पर्वत आणि खूप सारी आकर्षक ठिकाणे येथे आहेत. जी नवविवाहित जोडप्यांचं हनिमून यादगार बनवू शकतात.अंदमार निकोबार-सर्व बाजूंनी समुद्रानं वेढलेली अंदमान निकोबार बेटं हनिमूनसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतात. या हॉलीवूड स्टाईल डेस्टिनेशनवर तुम्ही जर हनिमूनसाठी जाऊ इच्छित असाल, तर तुम्ही बिनधास्तपणे अंदमान निकोबारला जाऊ शकता. निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात आकर्षक बीच, ताडाची उंचच झाडं, त्यांना बांधलेले झोपाळे, स्कूबा डायव्हिंग, ग्लास बोट राइड आणि विंड सर्फिंग तुमचं हनिमून यादगार बनवतील.
जम्मू-काश्मीर- जम्मू कश्मीर अर्थात पृथ्वीवरचं नंदनवन. पांढऱ्याशुभ्र बर्फाची झालर पांघरलेल्या उंचच उंच पर्वतरांगांच्या सानिध्यात हनिमूनचे सुंदर क्षण व्यतीत करणं अनेकांचं स्वप्न असते. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग हे हनिमूनसाठी अतिशय उत्कृष्ट असं ठिकाण आहे. येथील बर्फाच्छादित पर्वत, मुघल गार्डन आणि हिरव्यागार दऱ्या यामुळे हे ठिकाणं नवदांपत्यांना खुणावतं.
उत्तराखंड- उत्तराखंड मध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे आहेत. अतिशय सुंदर आणि बजेटमध्ये सुंदर आणि रोमँटिक ठिकाणी जायचे असेल, तर उत्तराखंड सर्वोत्तम आहे. नैनिताल, औली अशी बर्फाची झालर पांघरलेली अनेक ठिकाणं सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्समध्ये गणली जातात. औलीमध्ये झिप लाइन, ट्रेकिंग, स्कीइंग यांसारख्या उपक्रमांचाही तुम्हाला आनंद घेता येईल.
गोवा- हनिमूनसाठी गोवा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. पाम वृक्षांनी वेढलेला समुद्रकिनारा, प्राचीन चर्च आणि जलक्रीडा उपक्रम ही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. गोव्यात हनिमून साजरं करण्यासाठी अनेक समुद्रकिनारे आहेत, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता.
गुजरात- तुम्ही जर हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही गुजरातलाही जाऊ शकता. गुजरातमध्ये हनिमूनसाठी कच्छ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. खरेदीपासून ते नाईट लाईफपर्यंत येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही मिळेल. डेझर्ट सफारी आणि चंद्राच्या प्रकाशात वाळूवर रात्रीचे जेवण करण्याची मजाच वेगळी असते.
राजस्थान- शाही हनिमून साजरे करायचा असेल, तर राजस्थान हा एकमेव पर्याय आहे. तुमचे हनिमून रोमँटिक आणि रॉयल बनवू शकतील अशा लेक क्रूझपासून ते वाळवंटात उंटाच्या सवारीपर्यंत अनेक गोष्टी येथे आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान तुम्ही कधीही येथे भेट देऊ शकता. जैसलमेर, उदयपूर, माउंटअबू सारखी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत जिथे तुम्ही हनिमून साजरे करू शकता.हिमाचल प्रदेश-
हिमाचल प्रदेशमध्ये सर्व वैशिष्ट्ये आहेत, ज्याचा आनंद घेण्यासाठी लोक स्वित्झर्लंडमध्ये जातात. हिमाचल प्रदेशातील हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे आणि दऱ्यांमधील रोमान्सचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. हिवाळ्यातील बजेटमध्ये स्पोर्ट्स एक्टिव्हिटीजचा आनंद घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेश हे एक चांगले ठिकाण आहे.
दार्जिलिंग- दार्जिलिंगची गणना जगातील टॉप क्लास हिल स्टेशन्समध्ये केली जाते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे हनिमून इथे अगदी कमी खर्चात साजरा करू शकता. येथे तुम्ही सिंगामडी रोपवे, टायगर हिल्स, टॉय ट्रेन तसेच हिरवागार परिसर आणि सुंदर चहाच्या बागांना भेट देऊ शकता. हिवाळ्यात दार्जिलिंगचे सौंदर्य शिखरावर असते.
कर्नाटक- कर्नाटक आपल्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील कुर्गला भारताचे 'स्कॉटलंड' असेही म्हणतात. हे हिल स्टेशन हनिमून जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्यं अतिशय सुंदर दिसतात. याशिवाय तुम्ही येथे म्हैसूर, हम्पी, कुन्नूर, उटी आणि उडुपी सारख्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.