New Year Celebration esakal
2020 हे वर्ष आता मावळतीकडे झुकलंय. काहीच दिवसात नवीन वर्ष New Year 2021 येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही दरवर्षीप्रमाणे काहीतरी स्पेशल करण्याचा विचार करत असालच. तरीही यंदा नवीन वर्षाचं सेलिब्रेशन New Year celebration कुठं करायचं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. म्हणून यंदा नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वोत्तम अशा ठिकाणांबद्दल Destination आपण माहिती घेणार आहोत..
गोवा- आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाणारे गोवा हे भारतातील सर्वात रोमांचक ठिकाणांपैकी एक आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला गोव्याचे नाइटलाइफ, समुद्रकिनाऱ्यांवरील रात्रीच्या पार्ट्या, पब, बार आणि कॉकटेल, दिव्यांनी उजळलेले रस्ते पर्यटकांना सर्वात जास्त आकर्षित करतात. कळंगुट बीच, अंजुना बीच, फोर्ट अगुआडा, चर्च, दूधसागर धबधबा इत्यादी गोव्यातील उत्तम ठिकाणे आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहेउटी- तामिळनाडूमधील उटी हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडण्यापेक्षा इथल्या शांत वातावरणात पार्टी करण्यात एक वेगळीच मजा आहे. उटीचे सुंदर दृश्य तुम्हाला परत जाऊ देणार नाही. तुम्ही येथे बोट हाऊसचाही आनंद घेऊ शकता. याशिवाय बोटॅनिकल गार्डन, सेंट स्टीफन चर्च आणि थ्रेड गार्डनलाही भेट देऊ शकता.जयपूर- राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राहून तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. तुम्हाला हवे असल्यास चौकी धानीला भेट देऊन सांस्कृतिक नृत्य, कला, संगीत आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आनंद लुटू शकता. याशिवाय येथील अनेक पबमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन केले जाते.ऋषिकेश- ऋषिकेश हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठीही एक उत्तम ठिकाण आहे. प्रसिद्ध मंदिर आणि गंगा घाटासोबतच ट्रेकिंग, बंजी जंपिंग आणि राफ्टिंगसाठीही ऋषिकेश खूप प्रसिद्ध आहे. ऋषिकेशपासून थोड्याच अंतरावर शिवपुरी हे चांगले कॅम्पिंग ठिकाण आहे. येथे तुम्ही मित्रांसोबत पार्टीही करु शकता.कसोल- जर तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीसाठी चांगले ठिकाण शोधत असाल तर कमी बजेटमध्ये कसोलसारखा चांगला पर्याय मिळणे कठीण आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी येथे तरुणांची गर्दी जमते. कासोलला भारताचे इस्रायल असेही म्हटले जाते. येथे, कॅम्पमध्ये पार्टी आणि अतुलनीय बोनफायरची संपूर्ण व्यवस्था आहे. कसोलमधील खीर गंगा ट्रेक, मलाना गाव आणि पार्वती नदी यासारख्या ठिकाणांनाही भेट देता येते.नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठीही दिल्ली हा एक चांगला पर्याय आहे. दिल्लीची नाईट लाइफ नवीन वर्षाच्या दिवशी पाहायला मिळते. अनेक पबमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या रात्रभर सुरू असतात. तुम्ही अनेक हॉटेल्स आणि पबमध्ये नववर्ष साजरं करु शकता.मनाली- 2022 साली डोंगराच्या मधोमध राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची औरच... मनालीमध्ये कुटुंब, मित्र आणि खास लोकांसोबत उत्साहात नवे वर्ष साजरे करून तुम्ही तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता. मनालीच्या अनेक हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बर्फाच्छादित टेकड्यांमधील रोड ट्रिपची योजना देखील करू शकता. ही सहल तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवेल.शिमला- शिमला हे भारतातील प्रसिद्ध अशा ठिकाणांपैकी एक आहे. शिमल्याच्या थंड दऱ्या, पर्वत आणि बर्फामध्ये राहून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून तुम्ही तुमचे नवीन वर्ष खास बनवू शकता.मॅक्लिओड गंज- हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील मॅक्लिओड गंज हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. कमी पैशात मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर बिनधास्तपणे मॅक्लिओडगंज जा. येथे तुम्ही अनेक ऐतिहासिक मठ, भागसू फॉल, नामग्याल मठ, धरमकोट आणि त्रिंड ट्रेक सारख्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.शिलाँग - शिलाँगला भारताचे स्कॉटलंड म्हटले जाते. जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांत वातावरणात नववर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल तर शिलाँग हा एक चांगला पर्याय आहे. सुंदर तलाव, अद्भुत धबधबे आणि आकाशाचे चुंबन घेणारे पर्वत यांच्यामध्ये तुम्ही एक संस्मरणीय नवीन वर्ष साजरे करू शकता. भारताच्या उत्तर-पूर्व भागात लपलेले हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. शिलाँगमध्ये तुम्ही बोटिंग, फिशिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.