Top 5 highest mileage bikes in India Sakal
Top 5 highest mileage bikes in India: भारतात सध्या पेट्रोल दर गगनाला भिडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे आता मोठी दरवाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नक्कीच झळ सोसावी लागणार आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज असणाऱ्या म्हणजे एक लीटर पेट्रोलमध्ये जास्तीक जास्त अंतर जाऊ शकणाऱ्या मोटारसायकलचे पर्याय शोधत आहेत. चांगलं मायलेज देणाऱ्या भारतातील पाच बाईक्सची माहिती आज आपण घेणार आहोत.
Hero Splendor Pro (90 kmpl मायलेज)- हिरो स्पेंडर लाँच झाल्यापासून भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. ARAI नुसार स्प्लेंडर 90 kmpl चा मायलेज देते. हिरो स्पेंडर प्रो ची किंमत 49485 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या मोटरसायकल 97.2cc सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते 8.24 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हिरो स्पेंडर विविध व्हेरियंटमध्ये येते. त्यामध्ये Pro, Plus, i3S आणि iSmart 110 चा समावेश आहे.बजाज CT 100 (89 kmpl मायलेज)- बजाज CT100 ही एक लोकप्रिय बाईक आहे. कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेज हे या बाईकचं वैशिष्ट्य आहे. ARAI नुसार तिचे मायलेज 89 kmpl आहे.बाईकचं102 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन सुमारे 8 hp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क जनरेट करते. तिची किंमत 53696 रुपये (एक्स-शोरूम) आहे.TVS स्टार सिटी प्लस (86 kmpl मायलेज)- TVS Star City Plus 86kmpl च्या मायलेज देते. स्टार सिटी प्लस दोन प्रकारांमध्ये येते - ES ड्रम (एक्स-शोरूम किंमत - रु 70005) आणि टॉप व्हेरिएंट स्टार सिटी प्लस ES डिस्क (एक्स-शोरूम किंमत - रु 72755). स्टार सिटीमध्ये 109.7 cc चार-स्ट्रोक इंजिन असून ते 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते.बजाज प्लॅटिना 110 (80 kmpl मायलेज)- बजाज प्लॅटिना ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. ARAI नुसार Platina 110 चे मायलेज 80kmpl आहे. Platina 110 ची किंमत नवी दिल्ली येथे रु.65930 पासून सुरू होते, एक्स-शोरूम. या मोटरसायकलला पॉवरिंग 115 cc, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन आहे. त्याचे इंजिन 7000 rpm वर 8.6 PS कमाल पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 Nm पीक टॉर्क निर्माण करते. Platina 110 चे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.Honda CD 110 Dream (74 kmpl मायलेज)- Honda CD 110 Dream चे मायलेज 74kmpl आहे. यात BS6 अनुरूप 109.51cc CT 100 इंजिन आहे. हे इंजिन 7500 rpm वर 8.6hp ची पॉवर आणि 5500 rpm वर 9.30 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. BS6 Honda CD 110 Dream बाईक स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत 64505 रुपये ते 65505 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.