Most Expensive Train Rides Sakal
जगातील 5 सर्वात महागड्या ट्रेन राइड्स (Most Expensive Train Rides):
ट्रेनमधून प्रवास करणे निश्चितच आनंददायी, आरामदायीसुद्धा असते. त्यामुळे अनेकजण दुरच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. ट्रेनचा प्रवास (Travel) रोमांचकारी तर असतोच शिवाय स्वस्तही असतो. भारतातील जास्त लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक ट्रेनचे जनरल डबे, तसेच मुंबईतील लोकलमधील डबे तसे दाटीवाटाने भरलेले असतात. परंतु एक्सप्रेसच्या डब्यात मात्र तसं फारशी गर्दी नसते. त्यामुळेच अनेकजण बाहेर जाण्यासाठी ट्रेनचा (Train) पर्याय निवडतात. परंतु जगभरात अशाही काही ट्रेन आहेत की, ज्यातून प्रवास करणे म्हणजे एखाद्या चालत्याफिरत्या महालातून प्रवास करण्यापेक्षा कमी नाही. साहजिकच त्यांचे भाडंही तेवढंच असणार...आज आपण जगभरातील अशाच टॉप पाच ट्रेनची माहिती घेणार आहोत ज्यांचा प्रवास खूप महागडा परंतु तितकाच विलासी आहे. (Top 5 Most Expensive and Luxurious Train Rides in the World)
1. महाराजा एक्सप्रेस लक्झरी ट्रेन, भारत (Maharaja Express Luxury Train, India)- या ट्रेनमध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला राजे-महाराजांच्या युगात प्रवेश केल्याचा भास होईल. या ट्रेनचा प्रत्येक भाग पुरातन आणि रॉयल्टीने परिपूर्ण आहे. ट्रेनच्या रुपातील शाही महाल म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वोत्तम लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनमधून प्रवास करण्याचा अनुभव अद्भुत असतो. 2. व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस, युरोप (Venice Simplon Orient Express, Europe)- व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस (VSOE) ची गणना जगातील सर्वात महागड्या ट्रेन राईड्समध्ये केली जाते. या ट्रेनमधून तुम्ही प्रमुख युरोपियन स्थळांना प्रवास करू शकता. ही ट्रेन पॅरिस-इस्तंबूल आणि इस्तंबूल-व्हेनिस दरम्यान 6 दिवस/5 रात्री टूर पॅकेज देते. ट्रेनमध्ये 17 सुपर स्टायलिश कॅरेज, केबिन सूट आणि डबल केबिन आहेत.3. रॉयल स्कॉट्समन, यूके (Royal Scotsman, UK)- ओरिएंट-एक्स्प्रेस हॉटेल्सद्वारे संचालित, रॉयल स्कॉट्समनला संपूर्ण यूकेमध्ये प्रवास करण्यासाठी 8 दिवस/7 रात्री लागतात. या लक्झरी ट्रेनमध्ये सीट्स मर्यादित आहेत आणि ट्रेनमध्ये एका वेळी फक्त 36 पाहुण्यांना परवानगी आहे. त्यामुळे आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.4. आफ्रिकेचा रोवोस रेल प्राइड, दक्षिण आफ्रिका (Africa's Rovos Rail Pride, South Africa)- ही लक्झरी ट्रेन केपटाऊन ते कैरोपर्यंत प्रवाशांना घेऊन जाते. ही ट्रेन प्रिटोरिया आणि केपटाऊन दरम्यान दर आठवड्याला धावते आणि फक्त 72 प्रवासी घेऊन जाते. रॉयल सूट, डिलक्स सूट आणि पुलमन सूट श्रेणींमध्ये राहण्याची सुविधा देणारी ही जगातील सर्वात महागड्या ट्रेन राईडपैकी एक आहे. सर्व सूट जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशस्त बेड आणि सुंदर स्नानगृहांनी परिपूर्ण आहेत.5. पॅलेस ऑन व्हील्स, भारत (Palace on Wheels, India)- पॅलेस ऑन व्हील्स ही भारतातील दुसरी लक्झरी ट्रेन आहे. ट्रेनमध्ये आलिशान बाथरूम आणि झोपण्याची सुविधा आहे. त्यात दिलेले अन्न अविश्वसनीय असते! या प्रवासादरम्यान राजांसाठी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची संधी तुम्हाला मिळेल यात शंका नाही.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.