सध्या जगभरात एकच विषय आहे तो म्हणजे तालिबानी आणि अफगाणिस्तान. तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशानं हालचाली सुरु केल्या आहेत. तालिबान, अफगाणिस्तान, यांचे संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण यावर प्रकाशझोत टाकणारे चित्रपट यापूर्वी हॉलीवूडनं प्रदर्शित केले आहेत. सध्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. ज्या चित्रपटांनी तालिबान, त्यांची विचारसरणी आणि हिंसाचार या गोष्टी प्रभावीपणे मांडल्या त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
12 स्ट्रॉन्ग -
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. त्याची साऱ्या जगभर चर्चा आहे. आताच्या घडामोंडीवर भाष्य करणारा एक चित्रपट यानिमित्तानं आठवतो. तो म्हणजे १२ स्ट्राँग. अमेरिकेवर सप्टेंबर २०११ मध्ये तालिबाननं हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये जो धुडगूस घातला तो पाहण्यासाठी एकदा या चित्रपटाच्या वाटेला जावं. हा वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट आहे.
लोन सर्वाव्हयर -
२०१३ साली आलेल्या या चित्रपटामध्ये तालिबानी आणि अमेरिकी सैन्य हा विषय हाताळण्यात आला होता. त्यात अमेरिकी सैन्याला नामोहरम करत त्यांचा कशापद्धतीनं छळ करण्यात आला हेही यात सांगण्यात आले आहे. अमेरिका सैन्याचे काही सैनिक हे तालिबानचा कुख्यात नेता अहमद शाहला पकडण्यास जातात. त्यावेळी ते सैनिक आणि तालिबानी यांच्यात जो संघर्ष होतो तो या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
द आउटपोस्ट -
२०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अगदी अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भल्या भल्यांची झोप उडवली होती. अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या अमेरिकी सैन्यानं तालिबानच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. त्यानंतर झालेला हिंसाचार, हा या चित्रपटाचा मुख्य विषय होता.
झीरो डार्क थर्टी -
२०१२ मध्ये आलेल्या या मुव्हीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा उदय आणि मृत्यु हे दोन्ही विषय त्यात प्रामुख्यानं मांडण्यात आले होते. या चित्रपटावरुन काही काळ वादही निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.