पश्चिम घाटाच्या अत्यंत सुंदर सह्याद्री पर्वत रांगेत काेयनानगर वसलेले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातूल कायेनानगर हे युनेस्कोच्या जागतिक नेटवर्क ऑफ बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग आहे.
कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे. कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नयनरम्य असे नेहरू स्मृती गार्डन आहे.
कोयनानगरपासून दाेन किलाेमीटर अंतरावर असलेले नेहरू गार्डन अतिशय सुंदर असून इथून कोयना धरण व जलाशयाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. नेहरू गार्डन पासून पाच किलाेमीटर अंतरावर बोटॅनिकल गार्डन आहे. सह्याद्री पर्वत रंगामधील अतिशय दुर्मिळ वनस्पती, वेली व फुलझाडे पाहायला मिळतात.सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरातील नवजा धबधबा दिसतोही रौद्र आणि कोसळतोही रौद्र स्वरूपातच. त्याच्याखाली जाऊन भिजण्याचं धाडस भल्याभल्यांनाही होत नाही. तसा प्रयत्नही करणं तसं धोकादायकच. पण, वनखात्यानं आखून दिलेल्या रस्त्यानं गेल्यास, भन्नाट वाऱ्यामुळं या धबधब्यातून उडणाऱ्या तुषारांमध्ये भिजण्याचा आनंदही काही औरच...यंदाच्या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी, असाच हा धबधबा आहे.कोयनानगरला आल्यानंतर पर्यटक आवर्जुन चिपळणला जाणा-या कुंभार्ली घाटात जातात. हा घाट पर्यटकांत खूप प्रसिध्द आहे. पावसाळ्यात येथील धबधबे व कोकणातून घाटमाथ्यावर येणारे ढग असे दृश्य पाहायला मिळते.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.