प्रवास करणं, मजा करणं, नवीन ठिकाणी भेट देणं, नवीन ठिकाणांबद्दल माहिती एकत्रित करणं, या ठिकाणी फोटोग्राफी करणं, नवीन खाद्यपदार्थ चाखणे इत्यादी सर्व करण्यास कोणाला आवडणार नाही?
प्रवास करणं, मजा करणं, नवीन ठिकाणी भेट देणं, नवीन ठिकाणांबद्दल माहिती एकत्रित करणं, या ठिकाणी फोटोग्राफी करणं, नवीन खाद्यपदार्थ चाखणे इत्यादी सर्व करण्यास कोणाला आवडणार नाही? प्रत्येकाला आपल्या मित्रांसह सहलीवर जाण्याची इच्छा असते. कारण, प्रवासाची खरी मजा ही केवळ मित्रांसोबतच असते. अनेकांना भारतात प्रवास करायला आवडतो, तर काहींना परदेशात जाणं पसंत वाटतं. मात्र, थायलंड हे नेहमीच भारतीय लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. येथील ठिकाणांना मोठ्या संख्येनं भारतातील लोक भेटी देत असतात. येथील फुकेट शहर तर सर्वांनाच आवडतं. त्याचबरोबर, आता येथे पर्यटकांना फक्त 72 रुपयांमध्ये हॉटेल रूमसह अनेक चांगल्या सुविधा देण्याची ऑफर करण्यात आलीय. चला, तर मग याबद्दल जाणून घेऊया..दरम्यान, ज्यांनी कोरोनाची लस घेतलीय, त्यांच्यासाठी व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी फुकेट (थायलंड) शहर जुलै महिन्यापासून खुले करण्यात येणार आहे. ज्यांचे लसीकरण झाले आहे, ते या ठिकाणी भेट देऊ शकतात. इतकेच नाही, तर थायलंड टूरिस्ट ग्रुपतर्फे एक मोहीम देखील राबविण्यात आलीय. त्याअंतर्गत हॉटेलच्या खोल्यांना अगदी कमी पैसे द्यावे लागतील. टूरिझम कौन्सिल ऑफ थायलंड (टीसीटी) द्वारा चालविलेली ही मोहीम 'वन नाईट, वन डॉलर' म्हणून ओळखली जाते.'वन नाईट, वन डॉलर' या मोहिमेअंतर्गत हॉटेलच्या या खोल्यांची किंमत सुमारे एक डॉलर म्हणजेच, 72 रुपये (भारतीय पैशात) आहे. त्यामुळे काही हॉटेल रूम प्रवाशांना एका रात्रीत फक्त एक डॉलर देऊन देण्यात येणार आहेत. तसेच, ही मोहीम यशस्वी झाल्यास कोह समुई आणि बँकॉकसारख्या ठिकाणीही याची अंमलबजावणी होऊ शकते. मात्र, अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.प्रवाशांना अवघ्या एक डॉलरला ज्या खोल्या देण्यात येणार आहेत, त्या खोल्यांची किंमत एका रात्रीत 1000 ते 3000, 2328 ते 6984 रुपयांपर्यंत असते. थायलंड पर्यटन प्राधिकरणाचे गव्हर्नर युथासाक सुपासोर्न यांनी सांगितले, की फुकेट शहरात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना टप्प्याटप्प्याने देशात परवानगी देण्यात येणार असून ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे, अशाच प्रवाशांना येथे प्रवेश मिळणार आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना 1 जुलैपासून परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येथे लोकांना काटेकोरपणे नियमांचे पालन करावे लागेल.फुकेट शहरात जाऊन आपण स्पीडबॉडचा आनंद घेत, फी-फी आईलॅंड्सला देखील भेट देऊ शकता. इथली निसर्गरम्यता प्रत्येकालाच आकर्षित करत असते. येथे आपण समुद्रकिनाऱ्यावर आपला वेळ घालवू शकता. शिवाय मित्रांसोबत जेवणाची मेजवानी देखील करु शकता. हे ठिकाण फोटोग्राफीसाठी देखील उत्तम आहे, त्यामुळे येथे आपण फोटो सेशन करु शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.