पुणे: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जा, कट्टरतावाद आणि दहशतवादाचा विजय असे स्थित्यंतर आज जग पाहत आहे. अशावेळी मदर तेरेसा यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवण काढणे अधिक महत्त्वाचे आहे. 'जर जीवन दुसऱ्याकरीता जगता आले नाही तर ते जीवन नाही' असे ब्रिदवाक्य अनुसरून जीवन जगणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा यांचा आज जन्मदिवस.
कायम दुसऱ्याची सेवा आणि वंचितांना मदत करणे हेच ध्येय असलेल्या मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बानियामध्ये झाला. त्यांच्या लहानपणीचे नाव अॅक्नेस होते पण त्यांनी भारतात आल्यानंतर टेरेसा नाव ठेवले 1980 मध्ये त्यांना सर्वोच्च भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले.1929मध्ये भारतात येऊन त्यांनी गरिब, असाहय्य आणि गरजू लोकांसाठी काम करायला सुरवात केली. ही सर्व मदत त्यांनी निस्वार्थ भावनेने केली. निस्वार्थ भावनेने सेवा केल्यामुळे त्यांना दिनदुबळ्यांची आई म्हणूनही ओळखले जात असे.त्या मूळच्या भारतीय वंशाच्या नसल्या तरी, भारतीय लोकांनीही त्यांना प्रेम दिले त्यामुळे त्यांनी उर्वरित आयुष्य भारतात घालवायचा निर्णय घेतला. मदर तेरेसा यांचे भारतीयांसाठी योगदान मोठे आहे. त्यांना पद्मश्री व नोबेल या महत्त्वाच्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतात मिशनरी ऑफ चॅरिटीची स्थापना केली. 5 सप्टेंबर 1962मध्ये कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.