करवाचौथ हा महिलांसाठी खास दिवस. या दिवशी महिला साडी नेसून, दागिणे घालून सुवासिनी म्हणून शृंगार करतात. यंदा करवा चौथला लेटेस्ट, ट्रेंडी आणि हटके लुक तुम्हाला ट्राय करायचा असेल तर तुम्ही अनुष्का शर्माला फॉलो करु शकता.
अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच ट्रेंडी आणि फॅन्सी लूकमध्ये दिसते. साडीपासून ते अनारकली सुटपर्यंत सर्व ट्रेडीशनल लुकमध्येही ती नेहमीच सुंदर दिसते. तुम्हालाही जर करवा चौथला सुंदर दिसायचे असेल तर अनुष्काच्या हे पाच ट्रेडिशनल लूक तुम्ही ट्राय करू शकता.रेड व्हेलव्हेट साडी :
करवा चौथ हा दिवस म्हणून सुवासिनींचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सर्व स्त्रिया लाल रंगाच्या साडी किंवा ड्रेस परिधान करतात. जर तुम्हाला करवा चौथला लाल साडी नेसायाची असेल तर अनुष्का शर्माने नेसलेली रेड व्हेलवेट साडी हा उत्तम पर्याय आहे. हेव्ही ज्वेलरीसोबत तुम्ही हा रेड वेलव्हेट साडी नेसल्यास तुमचा लूक एकदम परफेक्ट होईल.
करवा चौथ लूक :
या फोटोमध्ये,करवा चौथ 2019 मध्ये अनुष्का शर्माने लाल रंगाची फुलांची प्रिंट असलेली साडी नेसली होती. त्यावर सुंदर झुमका आणि लाल बांगड्या, केसांच बन करून लाल फुल माळले होते. अनुष्काचा हा परफेक्ट सुवासिनी लूक केला होता. तर 2018 मध्ये अनुष्काने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती त्यावर मोत्याचे कानातले, सिंदूर आणि लाल टिकली लावून नवविवाहितेचा लूक केला होता. तुम्ही अनुष्काचा हे लूक करवा चौथला ट्राय करू शकता.अनारकली सूट :
या फोटोमध्ये, अनुष्का शर्माने साधा पांढरा अनारकली सूट परिधान केला आहे. हा लूक तिच्या मॅटरनिटी फॅशन लूकपैकी एक आहे. तुम्हीपण प्रेग्नेंट असाल तर अनुष्का शर्मासारखा मेटरनिटी लूक ट्राय करू शकता.
लेंहगा लव्ह
या फोटोमध्ये, अनुष्का शर्माने फ्लोरल लेहंगा घातला आहे ज्यावर तिने हेव्ही स्टेटमेंट ज्वेलरी वापरली आहे. अनुष्काचा हा लूक देखील तुम्ही या करवा चौथला ट्राय करू शकता.
सभ्यसाची साडी :
या फोटमध्ये अनुष्काने सभ्यसाचीने डिझाईन केलेली फुलांची प्रिंट असलेली साडी नेसली आहे असून त्यावर मोठे झुमके परिधान केले आहे. अनुष्का या साडीमध्ये आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील अनुष्काचा हा लूक ट्राय करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.