Tuljabhavani Mandir's Jalyatra Program esakal
तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमानिमित्त भव्य जलयात्रेचा सोहळा बुधवारी (ता.२७) पार पडला. येथील पापनास तीर्थ कुंड मंदिरापासून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जलयात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी कळसाचे पूजन करण्यात आले. अग्रभागी रथामध्ये कळस ठेवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे तुळजाभवानी मंदिरात कळस मिरवणुकीने आला. कलशाची तुळजाभवानी मंदिरात प्रदक्षिणा झाली.
तुळजापूर खुर्दमध्ये कळस आल्यानंतर कळसाचा फलाधिन्यास झाला. तुळजापूर खुर्द येथील मंदिराचे अध्यक्ष प्रा.विलास जगदाळे, त्यांच्या पत्नी प्रतिभा जगदाळे तसेच अजित नाईक, त्यांच्या पत्नी मंजूषा नाईक यांच्या हस्ते फलाधिन्यासाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुरोहित नागेशशास्त्री नंदीबुवा अंबुलगे, राजारामशास्त्री नंदिबुवा अंबुलगे, नाशिक येथील पुरोहित प्रभाकर गोडशे, पार्थ गोडशे, मंगेश जोशी, नरसोबाची वाडी येथील पुरोहित नारायण कुलकर्णी, पुरोहित किरण पाठक, विश्वनाथ ढोले, श्रीराम नंदिबुवा अंबुलगे, विजय पाठक, श्रीकृष्ण नंदिबुवा अंबुलगे, श्रीहरी नंदिबुवा अंबुलगे, ऋषिकेश जोशी आदींनी वेदपठण केले. त्यानंतर महिलांचा कुंकूमारचन कार्यक्रम पार पडला.
कळसास करण्यात आलेला फलाधिन्यास.माहेरवाशीणींची लक्षणीय उपस्थिती : तुळजापूर खुर्द येथील कलशारोहण कार्यक्रमास तुळजापूर खुर्द येथील सुमारे 300 माहेरवाशीणींना निमंत्रण देण्यात आले होते. माहेरवाशीणी येथे तीन दिवसांसाठी आलेल्या आहेत. नवविवाहित माहेरवाशीणींपासून ते वृद्ध माहेरवाशीणी या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. माहेरवाशीणींना कार्यक्रमात आदराचे स्थान देण्यात आलेले आहे. उद्या गुरुवारी (ता.२८) सकाळी अकरा वाजता कळसारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
कळसारोहणाचा कार्यक्रम जुन्या पिढीतील मंडळींनी आणि गावातील तरूणांनी यशस्वीपणे करून दाखवला आहे. जलयात्रेमुळे लहानपणीच्या आठवणी जागवल्या आहेत.
- नंदा ताकभातेअग्रभागी रथामध्ये कळस ठेवण्यात आला.तुळजापूर खुर्द येथील देवीची सालंकृत मूर्ती.तुळजाभवानी मातेचे महाद्वार, आर्य चौक, कमानवेस मार्गे कळस तुळजापूर खुर्द येथील देवी मंदिरात आला. कलशाच्या मिरवणुकीत वाघ्या मुरळी, धनगरी ढोल, ताशा, संबंळे आदीसह महिला तुळजापूर खुर्द भागातील नागरिक सहभागी झाले होते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.