Alok Nath accused of sexual misconduct  esakal
फोटोग्राफी

HBD Alok Nath: बॉलिवूडच्या संस्कारी बाबूजींवर झाले होते बलात्काराचे आरोप

संस्कारी वडिलांच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते.

सकाळ डिजिटल टीम

८०-९० च्या दशकात चित्रपटांमध्ये संस्कारी वडिलांच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी कोणाला बघितले असेल तर ते आहेत आलोक नाथ.पण या संस्कारी वडिलांच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते. 'MeToo' चळवळीदरम्यान आलोक नाथ हे एका घोटाळ्यात अडकले होते.

नाथ यांच्यावर २०१८ या वर्षात अनेक महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर मुंबई पोलीसांनी त्यांच्यावर बलात्काराचाही आरोप केला होता.
१९९० च्या दशकातील लेखक आणि निर्माती तारा हिने आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.तिने एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख करताना 'पडद्यावरील संस्कारी वडिलांची भूमिका साकारणारा वडिल' लिहत प्रश्नचिन्ह देत त्याच्यावर आरोप करणारी पोस्ट लिहीली होती.
नंतर एका मुलाखतीत ताराने तिने ज्या संस्कारी व्यक्तीबद्दल फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला ते आलोक नाथ असल्याचा खुलासा केला होता.त्यानंतर अनेक महिलांनी आलोक नाथांवर छळ केल्याचा आरोप केला होता.
इम्रान खान या निर्मात्याने तर दावा केला होता की,मै भी (मी टू) या माझ्या चित्रपटात आलोक नाथ यांची भूमिका असल्याने प्रेक्षक या चित्रपटाला प्रतिसाद देत नाहीत.मुख्य म्हणजे लैंगिक छळ हा विषय असलेल्या या चित्रपटात आलोक नाथ थेट न्यायाधिशाच्या भूमिकेत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT