Tv entertainment famous web series movies esakal
International Award Winner Indian Movies: सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपट यांची चर्चा आहे. गेल्या तीन ते चार (Social media news) वर्षांपासून ओटीटी या नव्या माध्यमानं आपलं सर्वांचं आयुष्य व्यापून टाकलं आहे. कोरोनाच्या काळात नेटकऱ्यांचे, प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर (Entertainment News) मनोरंजन करण्याचे श्रेय हे ओटीटी प्लॅटफॉर्मला जातं. या माध्यमानं मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आतापर्यत भारतातील (Ott news) अनेक मालिका आणि चित्रपटांना या ओटीटी माध्यमातून जगभर गौरवलं गेलं आहे. आपण अशाच काही मालिका आणि चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या प्रेक्षकांना आवर्जुन पाहायला हव्यात. त्या मालिकांना आणि चित्रपटांना जगभरातील विविध महोत्सवांमध्ये गौरविण्यात आले आहे. (International Award Winner Indian Movies)
मेडली - या चित्रपटामध्ये एकुण सहा लवस्टोरी आहेत. ज्यांना वेगवेगळी मानवी संवेदना आहेत. त्यांची वेगळी परिभाषा आहे. त्यातून आपण एका वेगळ्या विचारविश्वाशी जोडले जातो. दिग्दर्शकानं एका अभिनव प्रयोगातून वेगळी मांडणी मेडलीच्या माध्यमातून केली आहे. मोर शॉट्स प्लीज (सीझन 2)
या मालिकेला बुसान फेस्टिव्हलमध्ये एशियन कंटेट अॅवॉर्ड मिळाला होता. एका वेगळ्या दुनियतेतील महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या यावर भाष्य करणारी मालिका म्हणून या मालिकेचे नाव सांगता येईल. 2020 मध्ये या मालिकेचा गौरव करण्यात आला होता. त्यामध्ये कीर्ती कुल्हारी, मानवी गागरु, सयानी गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत.
परिक्षा - आदिल हुसेन यांनी या चित्रपटामध्ये कमालीचा प्रभावी अभिनय केला होता. त्याबद्दल त्यांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली होती. मुलाला चांगल्या शाळेत घालण्यासाठी पालकांचा प्रयत्न, येणाऱ्या आर्थिक अडचणी, सामाजिक प्रश्न यासाऱ्या गोष्टींवर प्रभावीपणे भाष्य या चित्रपटांतून करण्यात आले आहे. दिल्ली क्राईम - शेफाली शहाच्या या क्राईम सीरिजला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. प्रसिद्ध अशा इमी पुरस्कारानं देखील या मालिकेला गौरविण्यात आले होते. 2012 मध्ये दिल्लीमध्ये एका पीडितेवर बलात्कार झाला होता. त्यावर आधारित ही मालिका होती. 48 व्या इमी पुरस्कार सोहळ्यात दिल्ली क्राईमला बेस्ट ड्रामा सीरिजचा पुरस्कार मिळाला होता. भोसले - प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याचा आतापर्यतचा सर्वाधिक प्रभावी अभिनय म्हणून भोसले या चित्रपटाचे नाव घेतले जाते. या चित्रपटासाठी त्याला एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड़ मिळाला. एका आजारी महाराष्ट्रीयन पोलीस अधिकाऱ्यावर आधारित हा चित्रपट आहे. जो त्याच्या मर्जीशिवाय सेवानिवृत्त झाला. त्याच्या सेवेतील वेगवेगळ्या अनुभवांना चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न भोसले चित्रपटातून करण्यात आला आहे. द फॅमिली मॅन - प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीनं या मालिकेमध्ये श्रीकांत तिवारी नावाच्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारली होती. भारतीय वेब सीरिज विश्वातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेचे नाव सांगितले जाते. बेस्ट सीरिज, बेस्ट दिग्दर्शक, बेस्ट ओरिजनल स्क्रिन प्ले सारखे पुरस्कारही प्राप्त केले आहे. द डिसायपल - युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या पहिल्या कोर्ट या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जाणकार प्रेक्षक, अभ्यासक, समीक्षक यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. तीस वर्षानंतर व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवामध्ये जाणारी फिल्म म्हणून डिसायपलचं नाव घ्यावं लागेल. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.