काही मुलींना हाय हिल्स (High Heels) वापरायला खूप आवडते. बाजारातसुध्दा अनेक स्टाईलिश हाय हिल्स (Stylish High Hills) आले आहेत. जेव्हा फॅशनचा (Fashion) विचार केला जातो तेव्हा केवळ उत्तम आउटफिट, मेकअप (Makeup) किंवा दागिनेच (Jewelry) नाही तर फूटवेयर (Footwear) देखील खूप महत्त्वाचे असतात. हील्स सहसा मुलींसाठी 'गो-टू-फूटर' असतात. कारण त्या प्रत्येक ड्रेससोबत मॅचिंग होऊन जातात. पण काहीवेळा हील्स घालणे टाळावे लागते, पण आम्ही तुम्हाला सांगतो की काही हील्सचेही प्रकार आहेत. ज्यामुळे तुम्ही आरामदायी हील्स खरेदी करण्यासाठी गेल्यास, तुम्हाला रिग्रेट करावे लागणार नाही.
तुम्हाला फक्त तुमच्यासाठी योग्य हील्स फुटवेअर निवडण्याची गरज आहे. आरामदायी हील्सचे प्रकार, जे तुम्ही तुमच्या आउटफिट, सोयी आणि आवडीनुसार घालू शकता. त्याची चांगली गोष्ट अशी आहे की ते घातल्याने तुमच्या पायांना अजिबात दुखापत होणार नाही.वेजेस (Wedges heels):
जर हील्स तुमची गो-टू फूटर असेल, तर वेजेस तुमच्यासाठीच बनवल्या आहेत. ते घातल्याने जास्त वेळ चालणे सोपे होते. तुम्ही त्यांना कोणत्याही ड्रेससोबत कॅरी करू शकता. ते स्टायलिश तसेच आरामदायक आहेत.
म्यूल हील्स (Mule heels):
या हील्स घातल्याने तुमचे पाय दुखणार नाहीत. ते घातल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटू शकेल.
प्लॅटफॉर्म हील्स (Platform heels):
जर तुम्हाला दिवसभर हील्स घालायची असतील तर तुम्ही प्लॅटफॉर्म हील्स घालू शकता. या हील्स घालायला खूप आरामदायी असतात आणि तुम्ही त्या कोणत्याही ड्रेससोबत कॅरी करू शकता.ब्लॉक हील (Blocks heels):
स्टाईलिश आणि आरामदायक पुटवेअर म्हणजे ब्लॉक हील्स, त्या घातल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटू शकेल.
कोणतेही फूटवेयर खरेदी करताना, ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांचा सोल फार कठीण नाही किंवा तो लवकर खराब होणार नाही. याशिवाय हील्सची खरेदी करताना त्यांचा साइज नक्कीच चेक करा. तसेच एकदा ते फूटवेयर घालून चालण्याचा प्रयत्न करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.