Udayanraje Bhosale esakal
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये (Udayanraje Collar Style) प्रिय आहेत.खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या (Udayanraje birthday) निमित्तानं उदयनराजे मित्र समूहानं साताऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय. कोविड नियमांमधून थोडी सूट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय.सातारा वासियांच्या मनात उदयनराजे भोसले यांच्याविषयी एक वेगळा आदर आहे. शिवाजी महाराजांचे ते थेट १३ वे वंशज असल्याने सातारा आणि त्याच्या आसपास उदयनराजेंचा एक वेगळा दरारा आपल्याला सतत अनुभवायला मिळतो.कराडमधील एका कार्यक्रमात उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भावली. त्यामुळेच काही काय उदयनराजे भाषण संपवून आपल्या जागेवर बसत होते, त्यावेळी पवारांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या हातानं उदयनराजेंची कॉलर उडवली आणि साऱ्यांची मनं जिंकली.खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राज्यमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले व मुलं नयनतारा राजे, विरप्रतापसिंह राजे.उदयनराजेंचं बंधूप्रेम संबंध महाराष्ट्राला माहितीय. शिवेंद्रराजे-उदयनराजे एकमेकांवर कितीही आरोप-प्रत्यारोप करत असले, तरी त्यांचं 'बंधूप्रेम' कुठंच झाकून राहिलं नाही. कोणत्याही शुभप्रसंगी हे दोन्ही राजे एकमेकांचं तोंडभरुन कौतुक करायला कधीच विसरत नाहीत, इतकं त्याचं नातं घट्ट आहे.2019 : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत खासदार उदयनराजेंनी भाजपात जाहीर प्रवेश केला होता. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. उदयनराजेंनी भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीत प्रवेश केला.2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साताऱ्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. भाजपाचे विधानसभा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी उदयनराजेंचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. 2021 : सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये भेट झाली. विशेष म्हणजे, श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केल्यानंतर झालेली ही पहिली भेट होती.उदयनराजेंनी लॉकडाउनला विरोध करत साताऱ्यात भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली.साताऱ्याच्या पोवईनाका परिसरात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून उदयनराजेंनी चक्क भीक मागो आंदोलन केलं. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलकी कारभाराचाही निषेध व्यक्त केला होता.उदयनराजेंना पुस्तकं वाचायला खूप आवडतं. ते फावल्या वेळेत विविध प्रकारची (सामाजिक, राजकीय विचारवंत) पुस्तकं वाचत असतात.राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते. ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिलीय, असं उदयनराजे आपल्या पत्नीचं कौतुक करताना सांगतात. दमयंतीराजे भोसले असं उदयनराजेंच्या पत्नीचं नाव आहे. राणीसाहेबांच्या भक्कम साथीमुळंच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळतं, असंही उदयनराजे म्हणतात.उदयनराजेंना पत्नी दमयंतीराजे भोसले, मुलं नयनतारा राजे, विरप्रतापसिंह राजे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्यांनी विरप्रतापसिंहकडं (मुलगा) आपला मोबाईल दिला अन् झक्कास अशी सेल्फी काढली.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.