Ukrainian Couple Married In Warzone esakal
Ukrainian Couple Married In Warzone : प्रेम (Love) काय आहे? खऱ्या प्रेमाचं वर्णन करणं खूप कठीण आहे. खरं प्रेम त्या सागरासारखं आहे, ज्याची खोली न मोजता येण्यासारखी आहे. जेव्हा दोन मनांचं मिलन व्हायचं असतं, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही, मग ते युध्द का असेना!रशिया आणि युक्रेनमध्ये (Russian attack on Ukraine) जे युद्धजन्य ढग दाटून आलेत त्यातून मार्ग निघणं सध्यातरी कठीण असल्याचं दिसतंय. रशियानं केलेल्या हल्ल्यामुळं युक्रेनमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे. मात्र, असं असताना देखील रविवारी एका जोडप्यानं युद्धजन्य परिस्थितीत लग्न केलंय. या जोडप्याच्या धाडसाचं आणि जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतं आहे. हे जोडपं रशियाविरुद्ध त्यांच्या देशाच्या रक्षणासाठी सीमेजवळ तैनात आहे. युक्रेनची राजधानी कीवजवळ (Kyiv) हे जोडपं आपल्या देशाचं रक्षण करताना दिसतंय.लेसिया (Lesya) आणि वेलेरी (Valeriy) असं या जोडप्याचं नाव आहे. या दोघांनी कीवमध्ये लग्न केलंय. हे प्रेमीयुगुल युक्रेनच्या संरक्षण संघाचा भाग आहे. लेसिया आणि वेलेरी यांचं सैनिकांनी गिटार वाजवून आणि गाणी गाऊन स्वागत केलं. रशियानं आतापर्यंत युक्रेनवर 600 क्षेपणास्त्रं डागली आहेत. मृत्यू कोणत्या बाजूनं कधी येईल, हे कोणालाच माहीत नाहीय. अशा युद्धाच्या काळात या जोडप्यानं कोणत्या धाडसानं आणि हिंमतीनं हे लग्न केलंय, याचीच जोरदार चर्चा सुरुय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.