South African Cricketer Dewal Brewis esakal
बांगलादेशविरुद्ध ब्रेविसनं 134 धावांचं शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewal Brewis) यानं अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under-19 World Cup) आपल्या तुफानी खेळीनं चाहत्यांना प्रभावित केलंय. त्याच्या दमदार खेळीची देशातच नव्हे, तर जगभरात चर्चा होत आहे. 'बेबी डिव्हिलियर्स' (Baby De Villiers) म्हणून ओळखला जाणारा ब्रेविस सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.गुरुवारी बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) ब्रेविसनं 134 धावांचं शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. ब्रेविस या स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय.ब्रेविसनं या स्पर्धेत सहा सामने खेळले आहेत. त्यानं आपल्या सहा डावात 84.33 च्या सरासरीनं 506 धावा केल्या. यादरम्यान त्यानं दोन शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. तिन्ही यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.ब्रेविसची शैली अतिशय आक्रमक आहे. तो 90.20 च्या स्ट्राइक रेटनं खेळत असून त्यानं 45 चौकार आणि 18 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, ब्रेविस एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers) आपला आदर्श मानतो. विश्वचषकातील कामगिरीनंतर त्याच्यावर आयपीएलमध्येही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.