देशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा अभ्यास आणि त्याबद्दल सखोल माहिती जाणून घेत सोबत आपल्या कॅमेऱ्यात ते सर्व कैद करण्यासाठी मूळचा नाशिककर ओंकार करपे हा लेह ते कन्याकुमारीच्या प्रवासाला पायी निघाला आहे. चला तर पाहूया ओंकारच्या या प्रवासातील विलक्षण अशी क्षणचित्रे...
देशातील परंपरा व संस्कृती याचे जवळू दर्शन घेत ते सर्व आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी ओंकारने लेह पासून आपल्या पायी प्रवासाला सुरूवात केली आहे.'ओत्तरहिमाद्रीदक्षिणसमुद्रम' हे ब्रिद वाक्य मनाशी घेवून ओंकारचा प्रवास यशस्वीरित्या सुरू आहे. आणि हेच वाक्य प्रवासात प्रेरणा देतयं असे ओंकार अभिमानाने सांगतो.३० ऑगस्ट २०२१ रोजी लेह येथून त्याच्या पायी प्रवासाला सुरवात झाली.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशातून त्याने १०० दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. देशातल्या ग्रामीण भागातील संस्कृती आणि विविधतेचा शोध घेताना स्थानिक भाषा, विविध परंपरा, वेशभूषा, रूढी-परंपरा, चालीरीती, राहणीमान, अर्थार्जनाची साधने, कृषी व खाद्यसंस्कृती, धार्मिक विचारधारा यांचा अभ्यास करण्याची कल्पना त्याला सुचली आणि लागलीच त्याने या प्रवासाला सुरूवात केली. हिंदी भाषेमुळे संवाद साधण्यात
ओंकारला फारशी अडचण आली नाही.विविधतेत एकता असलेला खरा भारत खेड्यांत आढळला.
सर्वच ठिकाणी 'अतिथी देवो भव'चा प्रत्यय त्याला आला असे ओंकार अभिमानाने सांगतो. दररोज सुमारे २५ ते ३५ किलोमीटर अंतर चालायचे त्यानंतर एखाद्या गावात मुक्काम करून स्थानिकांशी संवाद साधायचा असा त्याचा नित्यदिनक्रम आहे.
ओँकारच्या या प्रवासात त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेली चित्रे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.