bollywood movie raanjhanaa Team esakal
तमिळ सुपरस्टार धनुषनं (tollywood actor dhanush) रांझणाच्या (raanjhanaa) माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तो चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याला ए आर रेहमाननं संगीत दिलं होतं. गाणीही श्रवणीय होती. कथा दमदार होती. दिग्दर्शन प्रभावी झालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट भावला होता. बॉक्स ऑफिसवरही त्यानं चांगली कमाई केली होती. (Unknown Facts about the Sonam Kapoor Dhanush starrer Raanjhanaa)
रांझणामध्ये धनुषनं एका दाक्षिणात्य ब्राम्हणाची भूमिका (south indian brahman) साकारली होती. तो वाराणसीमध्ये राहणारा होता. आनंद राय (anand l rai) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये धनुष एकदम परफ्केट सुट झाला होता. सुरुवातीला धनुषला घ्यावे की नाही असा प्रश्न निर्मात आणि दिग्दर्शक यांच्यापुढे होता. मात्र ज्यावेळी स्क्रिनिंग टेस्ट झाली तेव्हा त्यांना या चित्रपटासाठी धनुषच हवा होता. धनुषनं या चित्रपटामध्ये 17 वर्षाचा मुलगा आणि 30 वर्षाचा युवक अशा दोन्हीही भूमिका पार पाडल्या होत्या. एका ब्राम्हण मुलाचं मुस्लिम मुलीवर प्रेम बसतं. ते प्रेम आपल्याला मिळावं यासाठी तो सतत तिच्या पाठीमागे धावत सुटतो. तिला आपल्यावर कुणी प्रेम करतय याची जाणीवही नसते. तिचं प्रेम भलत्यावर. धनुषच्या जोडीला या चित्रपटामध्ये सहअभिनेत्री म्हणून सोनम कपूरनं भूमिका साकारली होती. सोनमनं झोया सीमची भूमिका केली होती. खरं तर सोनमला या चित्रपटामध्ये एक गंमतीशीर भूमिका साकारायची होती. मात्र तिला ब-यापैकी गंभीर स्वरुपाची भूमिका मिळाली होती. मी काही प्रोफेशनल अभिनेत्री नाही. मी त्याचे कुठलेही ट्रेनिंग घेतलेलं नाही. सावरियाच्या वेळेस मला ते घ्यावे लागले. मला रांझणासारखा चित्रपट करायचा पुन्हा मिळणार नाही. हे मला माहिती होते. हे संधी मी काही सोडली नाही. रांझणासाठी आपण काही वेगळं केलं नाही. ज्या सुचना दिग्दर्शकानं केल्या. त्याचे पालन केले. आणि मला या चित्रपटानं यश मिळवून दिलं. अशी भावना सोनम व्यक्त करतेरांझणावर त्यावेळी प्रसिध्द स्तंभलेखिका शोभा डे यांनी टीका केली होती. तेव्हा मला त्यांच्या टीकेवर उत्तर देता आले नाही. असं सोनम सांगते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.