मुंबईमधील कुलाबा परिसरात सुप्रसिद्ध अशी गेट वे ऑफ इंडिया (Gate Way of India) जगप्रसिद्ध आहे. गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. मुंबईतील (Mumbai) सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक असलेल्या गेट वे ऑफ इंडियाबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी बऱ्याच लोकांना माहित नाहीत. (Unknown things of Gate way of India)
1. गेटवे ऑफ इंडियाच्या निर्माणासाठी सुमारे 2.1 मिलीयन एवढा प्रचंड खर्च आला होता. या स्मारकाच्या केवळ घुमट बांधण्यासाठी त्यातील जास्तीक जास्त खर्च करण्यात आला होता. 2. गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचा ताजमहाल म्हटले जाते. 3. गेट वे ऑफ इंडियाची उभारणी भारत-सर्सेनिक वास्तुकलेच्या माध्यमातून केली आहे, जी गुजराती आणि इस्लामिक वास्तूशैलीचे मिश्रण आहे. 4. गेट वे ऑफ इंडियाचं डिझाईन स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने तयार केलं होते.5. गेटवे ऑफ इंडिया बेसॉल्ट आणि मजबूत काँक्रीटद्वारे बनवले गेलं आहे. जमिनीपासून त्याची उंची सुमारे 26 मीटर एवढी आहे. 6. गेट वे ऑफ इंडियाला भारताचं प्रवेशद्वार म्हटले जाते. 7. व्हिक्टोरिया राणीच्या स्वागतासाठी 1911 च्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाची उभारणी केली गेली. 8. गेट वे ऑफ इंडियाशेजारी भारतातील सुप्रसिद्ध असे हॉटेल ताज महाल पॅलेस (Hotel Taj Mahal Palace) उभं आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.