एमा राडुकानूने अफलातून कामगिरी करत तब्बल ५३ वर्षांनी US Open मध्ये इंग्लंडला महिला एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले.
US Open स्पर्धेत इंग्लंडच्या एमा राडुकानू हिने दमदार कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.तब्बल ५३ वर्षांनी एका इंग्लिंश महिला टेनिसपटूने US Open स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या आधी व्हर्जिनिया वेड हिने १९६८ मध्ये ही कामगिरी केली होती.इंग्लंडच्या इतिहासात आपलं नाव कोरणारी एमा हिच्याबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी...एमाचा जन्म कॅनडामध्ये झाला. तिचे आई-वडिला हे रोमानिया आणि चीनचे आहेत. पण दोन वर्षांची असताना ती इंग्लंडमध्ये वास्तव्यास गेली आणि त्यानंतर नोंदणी करून तिने इंग्लंडचे नागरिकत्व घेतले. एमाने अवघ्या पाचव्या वर्षी टेनिस खेळायला सुरूवात केली. आपल्या पालकांसोबत ती सहज म्हणून टेनिस खेळू लागली. नंतर त्यात रस वाटू लागल्यावर तिने तंत्रशुद्ध सरावास सुरूवात केली.एमाने ऑर्पिंग्टनच्या न्यूजस्टेड शाळेतून शिक्षण घेतले. याच शाळेतून जगप्रसिद्ध ऑलिम्पिकपटू डीन एशर स्मिथ हिनेही शिक्षण पूर्ण केले आहे.जगप्रसिद्ध ब्रिटीश टेनिसपटू अँडी मरे यांचे सासरे ही एमाने प्रशिक्षक आहेत. निगल सिअर्स हे त्यांचं नाव असून त्यांनीही तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते.विम्बल्डनच्या 'अंतिम सोळा'च्या फेरीत धडक देणारी ती स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाची स्पर्धक आहे.टेनिस जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल मानांकित असलेल्या सिमोन हॅलेपची ती खूप मोठी चाहती आहे. तसेच, स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला ती आदर्श मानते.US Open च्या पूर्ण स्पर्धेत एमाने एकही सेट गमावला नाही. स्पर्धेत तिने 18 सेट जिंकले. या आधी स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने २०१४ साली एकही सेट न गमावता ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.