आपल्या घरात बऱ्याचदा दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. अशा वेळी काहीजण नासलेल्या दुधाचे पनीर बनवतात. तर काही लोक ते फेकून देण्याचाही मार्ग अवलंबवतात. तसेच याच नासलेल्या दुधाच्या पाण्याचा तुम्ही असाही वापर करू शकता. चला तर मग त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
नासलेल्या दुधापासून पनीर बनवले जातेनासलेल्या दूधाचा वापर कणिक मळताना केला जातो यामुळे चपात्या नरम आणि पौष्टिक बनतात.नासलेल्या दुधाचे पाणी उपमा बनवताना वापरल्यास उपमाच्या स्वादला आणखीन जास्त टेस्ट येते. नासलेल्या दुधाला एका भांड्यात घेऊन गरम करा. त्यातील पाणी सुकून गेल्यानंतर त्यात थोडी साखर टाकून तुम्ही खरवस, बर्फी, पेढा यांसारखे पदार्थ बनवू शकता.जर तुम्हाला कोणती ग्रेव्ही असलेली भाजी बनवायची असेल तर तुम्ही नासलेल्या दुधाचा वापर करु शकता. याने भाजीची चवही बदलते आणि शरीराला पौष्टिक तत्व देखील मिळतात.नासलेल्या दुधाचे पाणी तुम्ही राईस किंवा पास्ता बनवताना वापरु शकता. असे केल्याने यात वेगळीच आणि मस्त फ्लेवर येईल.नासलेल्या दुधाच्या पाण्याचा वापर ज्यूस ची पौष्टिकता वाढविण्यासाठी केला जातो.सूप बनवताना स्टॉक किंवा पाणी नसेल तर नासलेल्या दुधाच्या पाण्याचा वापर करु शकता. यामुळे सूप खूपच स्वादिष्ट बनेल.नासलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा धुतला तर आपली त्वचा खूपच मऊ आण टोन्ड बनतेसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.