आपल्या देशात फुलांच्या शेकडो प्रजाती आढळतात. जे पर्यावरणाचं सौंदर्य वाढवून पर्यटनाला चालना देत आहेत. जर तुम्ही देखील कोणत्या नवीन ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला देशातील अशा 5 अज्ञात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (Valley of Flowers) बद्दल सांगणार आहोत. जिथं फिरणं हे देश-विदेशातील प्रत्येक पर्यटकाचं स्वप्न असतं.
भारतातील लोकप्रिय फुलांच्या खोऱ्यांपैकी हे एक आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला उत्तराखंडच्या गोविंदघाट गावापासून 17 किमी लांब ट्रेकनं जावं लागेल. ट्रेकर्समध्ये फुलांची ही व्हॅली खूपच लोकप्रिय असून नंदा देवी बायोस्फीअर रिझर्व्हचा हा एक भाग आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीअर रिझर्व्सपैकी हा एक भाग आहे. येथे तुम्हाला हिमालयीन मॅपल, ब्लू हिमालयन पोस्पी, ब्रह्मकमल, झेंडू, रोडोडेंड्रॉन, डेझी, प्राइम्युलस, ऑर्किड्स आणि वॉलच कोब्रा लिली यासह वनस्पतींची एक विस्तृत श्रेणी पहायला मिळेल. जर तुम्ही फुलांच्या या व्हॅलीवर पोहोचलात, तर तुम्ही जवळच्या हेमकुंड साहिब गुरुद्वारा आणि नंदा देवी राष्ट्रीय उद्यानालाही भेट देऊ शकता.फुलांची ही दरी समुद्रसपाटीपासून 2452 मीटर उंचीवर आहे. देश-विदेशातील फुलांच्या या दरीबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. ही दरी नागालँड-मणिपूर सीमेजवळ आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल, तर हे ठिकाण खरोखर तुमच्यासाठीच बनवल्याचा भास होईल. या खोऱ्यात लिली नावाची (Dzükou lily) फुलं फुलतात. विशेष गोष्ट म्हणजे, फुलांची ही प्रजाती केवळ नागालँडमध्ये आढळते. या फुलांव्यतिरिक्त, आपण येथे एकोनिटम, यूफोरबियास, रोडोडेंड्रोन आणि इतर प्रजातीची फुलं देखील पाहू शकता.हे फुलांचे खोरे नवविवाहित जोडप्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या खोऱ्याला विशेषतः हनीमूनचे 'नंदनवन' म्हणूनही ओळखलं जातं. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात येथे भेट देण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला नीलकुरिंजी नावाच्या भव्य लैव्हेंडर रंगाच्या फुलांसह हिरवे-हिरवे कुरणही दिसतील. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही फुलं दर 12 वर्षांतून एकदाच फुलतात. या वर्षी हे फूल पुन्हा फुललं आहे. या फुलाचे शास्त्रीय नाव स्ट्रोबिलेन्थेस कुंथियाना Strobilanthes Kunthiana आहे. ज्याला मल्याळम् आणि तमिळमध्ये नीलकुरिंजी अथवा कुरिंजी म्हणूनही ओळखलं जातं. हे प्रत्यक्षात एक झुडूप आहे, जे केरळ आणि तामिळनाडूच्या पश्चिम घाटातील शोला जंगलात आढळते.महाराष्ट्रातील कास पठार देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या पठाराचं नावं 'कासा' फुलावरून पडले असल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात. या पठाराला युनेस्कोनं हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. या पठारावर फुलांच्या 850 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. यामध्ये ऑर्किडची फुले, टूथब्रश ऑर्किड्स, इंडियन अरारोट, दीपकाडी फूल, वाई-तुरा आणि इतर अनेक प्रजातींचा समावेश आहे. फुलांचे हे सुंदर खोरे साताऱ्यापासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुणे शहरापासून तीन तासांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही या पठारावर पोहोचलात, तर तुम्ही जवळच्याच कास तलाव, वजराई आणि बामणोली धबधब्यालाही भेट देऊ शकता.निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला व्यस्त जीवनापासून थोडा शांत वेळ घालवायचा असेल, तर सिक्कीमची युमथांग व्हॅली तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. ही दरी समुद्र सपाटीपासून 3596 मीटर उंचीवर आहे. या खोऱ्यात तुम्हाला फुलांचे नेत्रदीपक दृश्य, याक आणि गरम झऱ्यांचे पाणी देखील पाहायला मिळेल. या शिवाय तुम्हाला Cinquefoils, Rhododendrons, Iris, Poppies, Lousworts, Primroses आणि Cobra-lilies या विदेशी फुलांचे प्रकार देखील पहायला मिळतील. तसेच, या खोऱ्यात 'शिंगबा रोडोडेंड्रॉन' अभयारण्य देखील आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.