क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका आज (११ जानेवारी) एक वर्षाची झाली. वामिकाच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात 'विरुष्का'ने शेअर केलेले तिचे काही फोटो..
विराट-अनुष्काने त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर वामिकाचे फोटो वेळोवेळी पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये त्यांनी कधीच तिचा चेहरा दाखवला नाही.
वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं विराटने स्पष्ट केलं होतं. वामिका हे देवी दुर्गेचं एक नाव आहे. विराट आणि अनुष्काने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं.विराटच नव्हे तर अनुष्कानेही आपल्या मुलीचा चेहरा न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांनी खासगी आयुष्यात माध्यमांनी ढवळाढवळ करू नये, असं आवाहनही केलं होतं.विराट-अनुष्काने सोशल मीडियावर वामिकाचा हा सर्वांत पहिला फोटो पोस्ट केला होता.वामिकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी, अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये वामिका गोड आवाजात तिला ‘मम्मा’ अशी हाक मारत होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.