Ashadi Ekadashi Wari And Aurangabad News esakal
लोहगाव (जि.औरंगाबाद ) : शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज दिंडी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लोहगाव व परिसरातील चार दिंड्यांनी सोमवारी (ता.२०) हरिनामाच्या जयघोषात श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे महंत व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रस्थान केले आहे.
दिंडीदिंडी निघण्यापूर्वी उपस्थित महंतवारकऱ्यांनी काही क्षणासाठी विसावा घेतलामहिला वारकरी जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भुकवारकरीटाळ मृदूंगाच्या गजरात दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्यादोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर प्रथमच पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराज दिंडी सोहळ्यासोबत जाण्यासाठी लोहगाव येथील ब्रह्मलिन महंत सोमगिरी बाबाजी पायी दिंडी सोहळा, पंचक्रोशीतील गंगेश्वर महादेव पायी दिंडी (लामगव्हाण) मुलानीवाडगाव जोगेश्वरी, श्री दत्त देवस्थान पायी दिंडी (ढाकेफळ), गुरू दत्तप्रसाद दिंड्यांनी जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भुक, भानुदास एकनाथ महाराजांच्या जयघोषात अंबऋषी संस्थान आमसरी (ता.सिल्लोड), गादीपती महंत कृष्णगिरी बाबाजी, महंत भरतगिरी महाराज, महंत अशोकगिरी महाराज, महंत शांतानंद महाराज, महंत धर्मानंद महाराज, मधुकर महाराज, रामेश्वर महाराज भवर, अमोल महाराज भवर, शंकर महाराज जांभळे, सिताराम जगताप, भागचंद शिंदे, अंकुश बोरूडे, दिलीप जगताप, धोंडीराम पुजारी, भगवान बोरूडे, हारिचंद् बोरूडे, विठ्ठल इथापे, कचरू जगताप, गिताराम भवर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शिसोदे, रामनाथ बेडके, मच्छिंद्र मरकड, विठ्ठल वाघमारे, काकासाहेब काळे, सरपंच संजय गरड, नामदेव गरड, प्रभाकर तांबे, मनेश आव्हाड, वसंतराव बोरूडे, अप्पासाहेब इथापे आदींच्या उपस्थितीत दिंड्यांनी प्रस्थान केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.