Vijay Mallya And Pinky Lalwani esakal
आज विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणी चार महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दुसरीकडे मद्य व्यावसायिक आणि यूबी समुहाचे माजी अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी लंडनच्या न्यायालयात सांगितले होते, की आर्थिक पातळी अडचणींना सामोरे जात आहे. कुटुंबातील लोक त्यांना आर्थिक मदत करत असल्यामुळे ते तग धरुन आहेत. यात त्यांनी आपल्या पत्नी ते मुलींची नावे घेतली. जाणून घेऊ या की त्यांच्या कुटुंबात कोण-कोण आहेत. ही स्थिती त्यांची कशामुळे झाली?
विजय मल्ल्या यांचे वडील विठ्ठल मल्ला कर्नाटकचे मोठे उद्योगपती होते. त्यांनी अनेक उद्योग सुरु केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. मग ते युनायटेड ब्रेवरीजमध्ये भागीदार बनले. काही वर्षानंतर ते कंपनीचे पहिले भारतीय संचालक बनले. आगामी काळात त्यांनी या कंपनीचे नियंत्रण शेअर आपल्या नावावर केले. देशातील मद्य व्यवसायावर विठ्ठल मल्ल्या यांचे वर्चस्व निर्माण झाले. वडिलांचा हा व्यवसाय हातात घेतल्यानंतर विजय मल्ल्या यांनी व्यवसाय वेगाने वाढवला.
या विजय मल्ल्यांची आई ललिता रमैय्या आहेत. त्या लंडनमध्येच आपल्या मुलासह एका बंगाल्यात राहत आहेत. त्या नेहमी आपल्या नात-नाती आणि मुलाची तिसरी पत्नी पिंकी लालवानीबरोबर पाहिले जात आहे. ललिता यांच्याकडे मोठी मालमत्ता भारत असल्याचे मानले जाते. लंडनमधील बँकांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणार संपत्तीही आहे.
या आहेत विजय मल्ल्या यांच्या पहिल्या पत्नी समीरा तैय्यबजी. समीरा या एअर इंडियात हवाई सुंदरी होत्या. त्या नेहमी परदेश उड्डाणात असत. जेव्हा विजय मल्ल्या एकदा एअर इंडियाने अमेरिकेला जात होते, तेव्हा त्यांची भेट समीरा यांच्याशी झाली. या पहिल्याच भेटीत दोघेही खूप जवळ आले. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. नंतर दोघांनी १९८६ मध्ये विवाह केला. या विवाहाने विजय मल्ल्या यांचे वडील विठ्ठल आनंदी नव्हते.
हा विवाह फार काळ टिकला नाही. एका वर्षानंतर घटस्फोट झाला. समीरा यांच्यापासून विजय मल्ल्या यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा झाला. आता तो त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे. सिद्धार्थजवळ काही स्वतःच्या कंपन्या आहेत. त्या ब्रिटन आणि त्याच्या बाहेर आहेत. सिद्धार्थ लंडनमध्ये वडिलांपासून वेगळा राहतो. समीरा यांनी घटस्फोट घेतल्यानंतर विवाह केलेला नाही. त्या भारतातच राहतात.
यानंतर काही वर्षांनी विजय मल्ल्या यांची भेट आपली एकेकाळची प्रेमिका रेखा हिच्याशी झाला. ते तिच्याशी विवाह करु इच्छित होते. मात्र वडिलांना हे नात मान्य नव्हते. त्यामुळे विजय मल्ल्या यांना माघार घ्यावी लागली होती. रेखा विजयपासून दूर गेल्यानंतर दोन विवाह केले. पहिला विवाह काॅफी व्यावसायिक प्रताप चेटियप्पा यांच्याशी झाला. त्यांना स्टेला नावाची एक मुलगी झाली. चेटियप्पा यांचा एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांचा दुसरा विवाह शाहिद मेहमूद यांच्या झाला. ते उद्योगपती होते.
त्यांच्यापासून एक मुलगी आणि एक मुलगा झाला. मुलगी लैलाला विजय मल्ल्या यांनी दत्तक घेतले. विजय आणि रेखा यांना आणखी दोन मुली झाल्या. हे पूर्ण कुटुंब आता लंडनमध्ये राहते. मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. न्यायालयात मल्ल्या यांनी याच मुलींविषयी सांगितले की त्या त्यांना आर्थिक मदत करत आहेत. रेखा आणि विजय मल्ल्या यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र दोघेही भेटत असतात. रेखाला साधारणपणे शांत आणि साधेपणाने जगायला आवडते.
आता पिंकी लालवानी त्यांच्या आयुष्यात आली आहे. लंडनच्या न्यायालयात मल्ल्याचे वकीलाने त्यांना पत्नी म्हणून उद्धृत केले आहे. पिंकी या कधीकाळी किंगफिशर एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून आल्या होत्या. मात्र त्या मल्ल्याच्या आयुष्यातच आल्या. त्या मल्ल्या यांच्याबरोबर लंडनच्या त्यांच्या दिमाखदार बंगाल्यात राहतात. पिंकी अनेक कंपन्यांच्या संचालक आणि भागीदार आहेत.
विजय मल्ल्या हे पूर्ण कुटुंबासह लंडनमध्ये राहत आहेत. या कुटुंबात त्यांची एकेकाळची पत्नी, सध्याची बायको, आई, तीन मुली आणि एक मुलगा आदींचा समावेश आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.