Sri Lanka Economic Crisis Sakal
Sri Lanka Economic Crisis: श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत आहे. देशात महागाईने कळस गाठला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच देशातील डिझेल पूर्णपणे संपलं आहे तसेच वीजेचं संकटही निर्माण झालं आहे. सध्या 10-13 तासांपर्यत वीज बंद करण्यात आली आहे. वीज वाचवण्यासाठी रस्त्यांवरचे पथदिवे बंद करण्यात आले आहेत. यामुळे श्रीलंकन नागरिकांचे प्रचंड हाल होत असून नागरिक सरकारवर प्रचंड संतापले आहेत. गुरुवारी रात्री शेकडो निदर्शकांनी राजधानी कोलंबोतील राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या घराबाहेर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. (Violent protest outside Sri Lanka President's house, nation runs out of diesel)
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटासाठी श्रीलंकेचे लोक आता सरकारला दोष देत आहेत. संतप्त लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शने करत आहे. गुरुवारी रात्री हजारो निदर्शकांनी राजधानी कोलंबोतील अंधारमय रस्त्यांवर मोर्चा काढला आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.यावेळी या मोर्चाला हिंसक वळण लागले. आक्रमक झालेल्या निदर्शकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संतप्त जमावाने गाड्या पेटवून दिल्या, तसेच तोडफोड केली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक सुरु केली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले. निदर्शकांनी त्याच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सशस्त्र सैनिकांनी त्यांना रोखले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या नळकांड्या वापरून जमावाला पांगवण्यात यश मिळविले. निदर्शकांनी राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, परंतु सशस्त्र सैनिकांनी त्यांना रोखले. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांच्या माध्यमातून जमावाला पांगवण्यात यश मिळविले.
यावेळी आंदोलकांनी सरकार आणि राजपक्षे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कोलंबोमध्ये आता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.दरम्यान श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत आपल्या परिने मदत करत आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.