Virat Kohli's ten things or memories that make him cricket king sakal
2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणानंतर, विराट कोहलीने आधुनिक काळातील क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 7962 धावा, 27 शतके आणि 40 विजयांसह विराटला भारताचा महान कसोटी कर्णधार म्हणून ओळखले जाते.
116 वि ऑस्ट्रेलिया – अॅडलेड 2012 | अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथा कसोटी सामना कोहलीचे लाल-बॉल क्रिकेटमध्ये कोहली यूग सुरु झाल्याचे सुचित करणारा सामना ठरला. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही कसोटी मालिका ४ - ० ने हरली. मात्र पहिले शतक झळकावले. 119 वि दक्षिण आफ्रिका – जोहान्सबर्ग 2013 | भारताने शिखर धवन आणि मुरली विजय हे दोन्ही सलामीवीर केवळ २४ धावांत गमावले, तेव्हा कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत डेल स्टेन, व्हर्नन फिलँडर, मॉर्ने मॉर्केल, जॅक कॅलिस आणि इम्रान ताहीर यांच्या विरुद्ध धडाकेबाज कामगिरी बजावली. परदेशात विराटचे हे दुसरे शतक होते आणि त्यामुळे भारताला सामना अनिर्णित राहण्यास मदत झाली.141 वि ऑस्ट्रेलिया – अॅडलेड 2014 | अॅडलेड येथे 2013-14 दौऱ्यातील पहिल्या सामन्यात कोहलीने दोन्ही डावात शतके झळकावली होती. त्याच्या 115 आणि 141 धावांच्या प्रभावी खेळींनी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली, परंतु हे पुरेसे ठरले नाही अखेरीस कमी पडले आणि 48 धावांनी पराभव पत्करावा लागला. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 169 वि ऑस्ट्रेलिया – मेलबर्न 2014 | पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर भारत तिसऱ्या कसोटीसाठी एमसीजीमध्ये दाखल झाला. मिचेल जॉन्सन, रायन हॅरिस, जोश हेझलवूड, शेन वॉटसन आणि नॅथन लायन यांच्यासारख्या खतरनाक आक्रमणाविरुद्ध कोहलीने अजिंक्य रहाणेसह (147) चौथ्या विकेटसाठी 262 धावांची जबरदस्त भागीदारी केली. यानंतर कॅप्टन्सीचं बॅटन धोनीकडून कोहलीकडे आले आणि भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन युग सुरु झाले.235 विरुद्ध इंग्लंड – मुंबई 2016 | कोहलीने जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स, जेक बॉल, बेन स्टोक्स, मोईन अली आणि आदिल रशीद यांच्या विरुद्ध 340 चेंडूत 235 धावा केल्या, हे त्याचे तिसरे द्विशतक आहे. भारताने एकूण 631 धावा केल्या आणि हा सामना एका डावाने जिंकला.153 वि दक्षिण आफ्रिका – सेंच्युरियन 2018 | संघ 28/2 वर संघर्ष करत होता. त्यावेळी विराट कोहली संघाच्या मदतीला धावून आला. त्याने १५३ धावांची खेळी करत भारताच्या धावसंख्याचे निम्मा भार स्वतःच्या खांद्यावर उचलला. मात्र आफ्रिकेने ही मालिका २-१ ने जिंकली.149 विरुद्ध इंग्लंड – बर्मिंगहॅम 2018 | पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत 2014 च्या भयानक दौऱ्यात कोहलीने इंग्लंडमध्ये 10 डावात केवळ 134 धावा केल्या होत्या. २०१८ मध्ये बर्मिंगहॅममध्ये कोहलीने 225 चेंडूत 149 धावा करुन २०१४ च्या कटू आठवणी पुसून टाकल्या. मात्र भारतीय संघाने सामना 31 धावांनी गमावला.
103 वि इंग्लंड – नॉटिंगहॅम 2018 | इंग्लिश भूमीत भारत विजयासाठी झगडत असताना कोहलीची ही शतकी खेळी झाली. पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर, तिसऱ्या कसोटीत कर्णधाराने पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा केल्या, ज्यामुळे भारताला 521 धावांचे लक्ष्य ठेवण्यात मदत झाली.123 वि ऑस्ट्रेलिया – पर्थ 2018 |2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय संघाने प्रथमच मालिका जिंकली होती. अॅडलेडमधील पहिला सामना जिंकल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि मुरली विजय हे सलामीवीर फक्त 8 धावांवर लवकर बाद झाले. त्यानंतर कोहली आला, त्याने 257 चेंडूत 123 धावांची दमदार खेळी करत संघाला एकूण 283 धावांपर्यंत मजल मारली. कोहलीने दमदार खेळी केली मात्र सामना जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. 254* वि दक्षिण आफ्रिका – पुणे 2019 | 2019 ची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खरोखरच विराट आणि संघासाठी उल्लेखनीय होती. पुण्यातील दुसऱ्या कसोटीत कर्णधार कोहलीने 336 चेंडूत 254 धावांची अप्रतिम खेळी केली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ठरली. विराटने एकूण 33 चौकार आणि दोन षटकार मारून भारताला दुसरी कसोटी एक डाव आणि 137 धावांनी जिंकण्यास मदत केली आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांचा व्हाईटवॉश केला.sakalब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.