Best Places to visit for couples in February Sakal
Best Places to visit for Couples: फेब्रुवारी (February) महिना जोडप्यांसाठी खास असतो. याला रोमँटिक महिना असेही म्हणतात. जर तुम्हीही व्हॅलेंटाईन वीक (Valentines Day) स्पेशल बनवण्यासाठी एखादं सुंदर डेस्टिनेशन शोधत असाल, तर आज आम्ही एक काही खास ठिकाणे तुम्हाल सुचवणार आहोत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता.
1.जोधपूर (Jodhpur)-राजस्थानचे (Rajsthan) हे शहर ब्लू सिटी (Blue City) म्हणून ओळखले जाते. येथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील. तुम्ही अनेक शाही महाल आणि इमारती पाहू शकता. उम्मेद भवन पॅलेस, मेहरानगड किल्ला, राव जोधा डेझर्ट रॉक पार्क, घंटा घर ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.2. नैनिताल (Nainital)- नैनिताल हे उत्तराखंडमधील (Uttarakhand) सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, जर तुम्हाला पर्वत आणि पाणी आवडत असेल तर तुम्ही नैनितालला भेट देऊ शकता. तुम्हाला नैनिताल नक्की आवडेल. नैनी लेक, नैना देवी मंदिर, राजभवन, गोविंद बल्लभभाई पंत चिडिया घर, टिफिन टॉप यांसारखी अनेक रोमांचक ठिकाणे येथे आहेत.3. गोवा (Goa)- हनिमून डेस्टिनेशन्समध्ये गोवा अव्वल स्थानावर आहे. येथे तुम्हाला नाईट लाईफचा आनंद लुटताना खूप मजा येईल. बजेट डेस्टिनेशनमध्ये गोवा हे कोणत्याही परदेशी ठिकाणापेक्षा कमी सुंदर नाही. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवू शकता.4. पंचमढी (Panchmadhi)- मध्य प्रदेशातील हे सुंदर डेस्टिनेशन जे तुम्हाला नक्की आवडेल. जटाशंकर गुहा, पंचमढी धबधबा, पांडव गुंफा, भेडाघाट अशा रंजक ठिकाणांशिवाय येथे निसर्गसौंदर्यही पाहायला मिळते.5. कच्छचे रण (Rann Of Kutch)- जर तुम्हाला नद्या, पर्वत आणि धबधब्यांपेक्षा वेगळे काही पहायचे असेल, तर गुजरातमधील रन ऑफ कच्छ हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. गुजरातमधील कच्छ शहरात जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट आहे, जे 'कच्छचे रण' म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूला राजस्थानचे थारचे वाळवंट आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.