कोल्हापूर : सध्या कोरोनामुळे आरोग्याचे महत्व लोकांच्या लक्षात आले आहे. शरीर सुदृढ आणि ठणठणीत, आरोग्य संपन्न ठेवायचे असल्यास योग्य आहार, वेळेत आणि पुरेशी झोप घेण्याचा डॉक्टर सल्ला देतात. या काळात व्यायाम, आहार या गोष्टींवर भर देवून शरीरासोबत मानिसक संतुलन चांगले ठेवता येते. त्यामुळे दिवसभर आपण फ्रेश दिसतो. डॉक्टारांनी या काळात व्हिटामीन्सची शरीराला अधिक आवश्यकता असल्याचे सांगतात. त्यामुळे व्हिटॅमीन्स वाढवणाऱ्या गोष्टींचा उपयोग आहारात करण्याचा सल्ला ते देतात.
व्हिटामीन सी शरीरासाठी अधिक गरजेचे आहे. दररोज महिलांना ७५ आणि पुरुषांना ९० मिलीग्रॅम व्हिटामीन सी ची गरज असते. आपले शरीर व्हिटामीन सी तयार करत नाही. त्यामुळे रोजच्या आहारात हे असेलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. व्हिटामीन सी कोणत्या लोकांत असते?
जेव्हा शरीरातील व्हिटामीन सीचे प्रमाण कमी होते तेव्हा त्याचे काही विषेश लक्षणे दिसायला लागतात. ज्यांचा आहार सकस नाही. जे किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. शिवाय ज्यांना सिगरेट, दारू असे व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये व्हिटामीन सी कमतरता असते. जखम लवकर न भरणे
तुम्हाला एखादी जखम झाली आणि ती लवकर भरत नसेल तर समजून जा की, तुमच्यात विटामिन सी ची कमतरता आहे. अशावेळी शरीरामध्ये कोलेजन बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जे स्किन रिपेअर करण्याचं काम करत. यामध्ये अशी काही घटक आहेत ज्यामुळे शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरण्याचे काम करते.दातातून किंवा नाकातून रक्त येणे
रक्तवाहिन्या स्वस्थ ठेवण्यासाठी विटामिन सी चा उपयोग होतो. दात आणि हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. आजारी असलेल्या व्यक्तींनी दोन आठवड्यांमध्ये अधिक प्रमाणात द्राक्षे खाल्ली तर हिरड्या किंवा दातातून रक्त निघणे बंद होते. नाकातून रक्त येणे कमी होते. वाढणारे वजन
अनेक संशोधनातून वजन वाढण्याचे कारण हे से विटामिन असू शकतं असं सिद्ध झाला आहे. चरबी वाढण्यासाठी व्हिटॅमिन परिणामकारक ठरते परंतु व्हिटॅमिन सी ची योग्य मात्रा मिळाल्यास हे वजन मर्यादित राहू शकते. सुकलेली त्वचा
व्हिटॅमिन सी ची कमी असल्याने तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. तसेच तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. जे लोक व्हिटॅमिन सी चा समावेशक आहार घेतात. त्यांची स्कीन मुलायम राहते आणि त्वचेवर परिणाम करणाऱ्या घटकांपासून दूर ठेवते.डोळ्याला कमी दिसणे
वाढत्या वयामुळे तुमचे डोळ्यांची कमी दिसण्याची अडचण येऊ शकते. हा प्रॉब्लेम विटामिन सी च्या कमतरतेमुळे होता. आहारात व्हिटॅमिन सी चा वापर नसल्यास तुम्हाला मोतीबिंदू सारख्याही काही समस्या उद्भवू शकतात.रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
व्हिटॅमिन सी कमी असल्यास रोग प्रतिकार शक्ती कमी होते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. परंतु सी व्हिटॅमिन योग्य मात्रा शरीरात असेल तर बरेच आधार आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात.व्हिटामीन सी वाली फळे
संतुलित आहारामुळे व्हिटामीन सी ची कमतरता दूर होते. अर्धा कप कच्ची लाल सिमला मिरची, संत्र्याचा ज्यूस, शिजलेली ब्रोकलीमध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये संत्री, लिंबू, पालक, किवी, आवळा, ब्रोकली या फळांचा समावेश करून शकता.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.