वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचे वजन वाढण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आजारांचा विळखाही वाढतोय.
होळीच्या सणात बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेताना बरेचजण गरजेपेक्षा जास्त जेवण करतात, त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
सणांनंतर तुम्हालाही वजन वाढण्याची चिंता सतावत असेल तर या समस्येवरचा उपाय आम्ही घेऊन आलो.आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची चरबी तर बर्न होतेच, पण शरीराला डिटॉक्सिफायही होते.दिवसातून थोडं थोडं जेवण करा आणि आपल्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा.
भाज्यांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्याच्या आहारात भाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल.
चांगली झोपही वजन कमी करण्यास मदत करते, असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे.
सणानंतर वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइज करणे खूप फायद्याचे ठरते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.