जगात पाप समजल्या जाणाऱ्या काही गोष्टी करण्याची येथे सूट आहे.
जगातील प्रत्येक समाजात विवाह हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातं आणि पर्यायायानं आपला वंश पुढे नेण्याच्या उद्देशाने बनवलेल्या या बंधाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी रूपे देण्यात आली आहेत. काळानुसार विवाहसोहळाही बदलला आहे, परंतु अनेक आदिवासी जमाती अजूनही त्यांच्या परंपरा आणि जुन्या काळातील समजूती पाळत आहेत. या परंपरा आज लोकांना विचित्र वाटत असल्या, तरी आज आम्ही तुम्हाला अशा एका जमातीबद्दल सांगणार आहोत, जिथे सध्याच्या लोकांच्या मते स्त्री आणि पुरुषाचे नाते खूप गुंतागुंतीचे असते. येथे पुरुष एका विशेष उत्सवाद्वारे इतर पुरुषांच्या पत्नीं पळवून नेतात आणि स्त्रियांना एकापेक्षा जास्त जोडीदार (मल्टिपल पार्टनर्स) असण्याची परवानगी आहे.
आफ्रिकेतील साहेल प्रदेशात राहणारी बंजारांची आदिवासी जमात वोडाबे आपल्या विचित्र परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. या जमातीत महिलांना खूप स्वातंत्र्य दिले आहे. जगात पाप समजल्या जाणाऱ्या काही गोष्टी करण्याची येथे सूट आहे. इथे लग्न आणि नात्याचा अर्थ खूप वेगळा आहे. हे योग्य की अयोग्य हे प्रत्येकाच्या विचारावर अवलंबून आहे पण या जमातीत इतर देशांत दिसतो त्याप्रमाणे विवाह सोहळा दिसत नाही. पत्नी चोरी करण्याची प्रथा-
इतर पुरुषांच्या बायकांची चोरी करणे, ही या जमातीची विशेष प्रथा आहे. येथे याकी नावाचा एक विशेष उत्सव साजरा केला जातो जो १० दिवस चालतो. या सणाला वाईफ स्टीलिंग फेस्टिव्हल असेही म्हणतात.सणाच्या दिवशी पुरुष तासनतास वेषभूषा करतात आणि विचित्र पोशाख परिधान करतात. चेहऱ्यावर नैसर्गिक गोष्टी वापरून मेक-अप करतात आणि ओठांवर पेंट करतात. जेणेकरून त्याचे पांढरे दात आणखी चमकतील. इतकेच नाही तर ते अनेक प्रकारचे दागिनेही घालतात. ही सजावट ते महिलांना आकर्षित करण्यासाठी करतात. यानंतर ते महिलांसमोर अनोखं नृत्य करतात. या महिला बहुतांश विवाहित असतात. या विवाहित महिलांना त्यांच्यापैकी कोणत्याही पुरुषाला जोडीदार म्हणून निवडण्याचा अधिकार आहे. मग त्या त्यांना आवडलेल्या पुरुषाबरोबर लग्न करून आधीच्या नवऱ्याला घटस्फोट देतात नाहीतर दोघांसोबत एकत्र राहतात.महिलांना अनेक भागीदार असतात -
फेस टू फेस आफ्रिका वेबसाइटनुसार, महिला सणाच्या रात्री आपला जोडीदार निवडतात. त्या एकापेक्षा जास्त जोडीदार निवडू शकतात आणि त्यांच्याशी संबंध बनवू शकतात. बायका चोरण्याचा हा प्रकार एक रात्र, काही रात्री किंवा लग्नाच्या रुपाने आयुष्यभर असाच चालू असतो.
वेबसाइटनुसार महिलेचा पहिला नवरा त्यांचे कुटुंबीय निवडतात आणि या सणाच्या माध्यमातून त्या स्वतःहून दुसरा नवरा निवडू शकते. जर एखाद्या स्त्रीने कुरूप पुरुषाशी लग्न केले असेल आणि पतीला माहित असेल की त्याची पत्नी त्याच्यावर खूश नाही, तर तो पत्नीला दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्याची परवानगी देतो जेणेकरून त्यांना एक सुंदर मूल होईल.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.