लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम प्रत्येकाच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे. चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, ड्राय फ्रूट्स, मॅँगो, पायनापल इत्यादी फ्लेवर्स असलेल्या आइस्क्रीम बद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जर तुम्हालाही विविध स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई खाण्याची आवड असेल, तर काही आइस्क्रीम फ्लेवर्स आहेत जे तुम्ही त्याची चव चाखल्यावर आश्चर्यचकित व्हाल. पण तुम्हाला जगातील सर्वात वेगळ्या आइस्क्रीम फ्लेवर्सबद्दल माहिती आहे का? चला ते आइस्क्रीम फ्लेवर्सबद्दल जाणून घेऊयात...
चिकन विंग्स आइस्क्रीम:
काही लोकांना जास्त मांसाहारी खायला आवडते. ज्यांना प्रत्येक डिशमध्ये चिकन, मटणची चव आवडत असते. एकदा जपानमधील एका आइस्क्रीम कंपनीने चिकन चवीचे 'चिकन विंग्स आइस्क्रीम' बनवले, ज्यासाठी लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. गार्लिक फ्लेवर आइस्क्रीम:
लसूण सामान्यतः भाज्या किंवा डिशेस चवीसाठी वापरला जातो. पण जपानमधून आलेले गार्लिक फ्लेवर आइस्क्रीम खाऊन तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.स्पाइसी नूडल्स आइस्क्रीम:
बदलत्या काळात चायनीज खाद्यपदार्थ प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहेत. पण तुमच्या आवडत्या आइस्क्रीम फ्लेवरमध्ये स्पाइसी नूडल्सची टॉपिंग तुम्हाला एक अतिशय चविष्ट चव देईल.ईल डिलाइट:
मासेप्रेमींना आइस्क्रीमसह या इलेक्ट्रिक फिशची चव घेण्यास नक्कीच आवडेल. 'ईल डिलाईट' नावाच्या या आइस्क्रीमवर टॉपिंग म्हणून दिले जाते.
ग्रीन चिली आइस्क्रीम:
चीनमध्ये वेगळी चव असलेले गोड पदार्थ काहींना खूप आवडतात. तिथूनच या मसालेदार हिरव्या मिरचीचा स्वाद असलेल्या 'ग्रीन चिली आइस्क्रीम' चा ट्रेंड सुरु झाला.सोया सॉस आइस्क्रीम:
सोया सॉस चायनीज पदार्थांमध्ये सामान्यतः वापरला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, की 'सोया सॉस आइस्क्रीम' नावाच्या आइस्क्रीमची चवही असते. आइस्क्रीममध्ये वापरलेले सोया सॉस त्याच्या गोडीमध्ये भर घालते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.