Which player playing most IPL matches sakal
आयपीएलच्या १५ व्या हंगामाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात सर्वच संघांचा नूर पालटणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हा हंगाम एक नवा अध्याय सुरू करत आहे. यानंतर अनेक युवा खेळाडू आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज होतील. दरम्यान, आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूने कसे योगदान दिले हे पाहणे संयुक्तिक ठरणार आहे. सामने खेळण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडूच आघाडीवर असणार यात शंका नाही. मात्र या यादीत दोन विदेशी खेळाडूंनीही आपले स्थान मिळवले आहे. कोण आहे ते दोन विदेशी खेळाडू?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 14 हंगामात एकूण 220 सामने खेळले आहेत. धोनीने आता दोन संघांसाठी आयपीएल सामने खेळले आहेत. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे सुपर जायंट्स या दोन संघाकडून खेळला आहे. धोनीने या कालावधीत 4747 धावा केल्या आहेत.दिनेश कार्तिक हा आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे. कार्तिकने आतापर्यंत 213 सामने खेळले आहेत. तो आतापर्यंत 6 संघांसाठी आयपीएल खेळला आहे. कार्तिकच्या नावावर 4046 धावा आहेतरोहित शर्माच्या नावावर 213 आयपीएल सामनेही नोंदले गेले आहेत. रोहितने डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून आयपीएल सामने खेळले आहेत. रोहितने आयपीएलमध्ये ५६११ धावा केल्या आहेत.या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सर्व हंगाम खेळला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये 207 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 6283 धावा आहेत.सुरेश रैनाही या बाबतीत टॉप-५ मध्ये येतो. त्याने 205 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर ५५२८ धावा आहेत. रैना आतापर्यंत चेन्नई आणि गुजरात लायन्सकडून सामने खेळताना दिसला आहे.अष्टपैलू रवींद्र जडेजानेही आयपीएलचे 200 सामने खेळले आहेत. त्याने 2386 धावा आणि 127 विकेट घेतल्या आहेत. तो आतापर्यंत चार संघांसाठी आयपीएल खेळला आहे.या यादीत रॉबिन उथप्पा सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 193 सामने खेळले आहेत. उथप्पाच्या नावावर ४७२२ धावा आहेत. उथप्पा सहा संघांसाठी आयपीएल खेळला आहे.शिखर धवनच्या नावावर आयपीएलमध्ये १९२ सामने नोंदले गेले आहेत. त्याने 5784 धावा केल्या आहेत. धवन आतापर्यंत 5 संघांसाठी आयपीएल खेळला आहे.या यादीत एबी डिव्हिलियर्स पहिला परदेशी खेळाडू आहे. तो आतापर्यंत दोन संघांसाठी आयपीएल खेळला आहे. डिव्हिलियर्सने 184 सामन्यात 5162 धावा केल्या आहेत.टॉप-10 मध्ये किरॉन पोलार्ड हा दुसरा परदेशी खेळाडू आहे. त्याने आयपीएलचे 178 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 3268 धावा आणि 65 बळींचा समावेश आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.