टेरर फंडिंग प्रकरणी (Terror funding Case) यासिन मलिकला (Yasin Malik) आज शिक्षा सुनावली जाणार आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी एनआयएनं न्यायालयाकडं केलीय.
टेरर फंडिंग प्रकरणी (Terror funding Case) यासिन मलिकला (Yasin Malik) आज शिक्षा सुनावली जाणार आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी एनआयएनं न्यायालयाकडं केलीय. 56 वर्षीय यासीन मलिक अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये (Kashmir) भारताविरुद्ध कट रचत आहे. चला जाणून घेऊया यासिन मलिकबद्दल...यासिनचे वडील होते बस चालक : यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरमधील मैसुमा इथं झाला. यासिनचे वडील गुलाम कादिर मलिक (Ghulam Qadir Malik) हे सरकारी बस चालक होते. यासिनचं संपूर्ण शिक्षण श्रीनगरमध्ये झालं. त्यानं श्री प्रताप महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. यासिन मलिकनं जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख बनण्यापर्यंतची गोष्ट एका सामान्य विद्यार्थ्यांच्या मुलाखतीत सांगितली होती. त्यात त्यानं दावा केला होता की, काश्मीरमध्ये लष्कराचे अत्याचार पाहून आपण शस्त्र उचललं. यानंतर यासिननं 80 च्या दशकात 'ताला पार्टी' स्थापन केली होती, ज्यामुळं त्यानं खोऱ्यात अनेकदा दहशतवादी घटना घडवून आणल्या होत्या.
क्रिकेट मैदानाची खेळपट्टी केली खराब : ही गोष्ट 13 ऑक्टोबर 1983 ची आहे. काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्रिकेट सामना सुरू होता. लंच ब्रेक दरम्यान अचानक 10-12 मुलं खेळपट्टीच्या मैदानावर पोहोचली आणि त्यांनी खेळपट्टी खराब करण्यास सुरुवात केली.यासिन मलिक पहिल्यांदाच पकडला गेला : 13 जुलै 1985 रोजी काश्मीरमधील ख्वाजा बाजार इथं नॅशनल कॉन्फरन्सची रॅली होत होती. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. यादरम्यान 60 ते 70 मुलं आली आणि त्यांनी मध्येच फटाके फोडले. त्यावेळी बॉम्बस्फोट सुरू झाल्याचं सगळ्यांना वाटलं. सर्वत्र गोंधळाचं वातावरण होतं. त्यानंतर यासिन मलिक पहिल्यांदाच पकडला गेला.
'ताला पार्टी'चं नाव बदलून 'आयएसएल' : 1986 मध्ये मलिकनं 'ताला पार्टी'चं नाव बदलून 'इस्लामिक स्टुडंट्स लीग' (ISL) केलं. यामध्ये तो फक्त काश्मीरमधील तरुणांचा समावेश करायचा. काश्मीरला भारतापासून वेगळं करणं हा त्याचा उद्देश होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणणाऱ्या अशफाक मजीद वानी, जावेद मीर आणि अब्दुल हमीद शेख या दहशतवाद्यांचा आयएसएलमध्ये समावेश होता.
मकबूल भट्टच्या फाशीला विरोध : 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भट्टला देशविरोधी कारवाया आणि दहशतवादी घटनांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. तेव्हा यासिन मलिक आणि त्यांच्या पक्षानं कडाडून विरोध केला. ठिकठिकाणी मकबूल भट्टच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आलं होतं. या प्रकरणी यासिनला पोलिसांनी अटक केली व चार महिनं तुरुंगात ठेवलं.यासिन ठेवलं राजकारणात पाऊल : काश्मीरमध्ये 1980 पासून हिंदूंवर हल्ले सुरू झाले. यामध्ये यासिन मलिक आणि त्याच्या साथीदारांचं नाव येत होतं. वाढत्या हिंसक घटना पाहता ७ मार्च १९८६ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील गुलाम मोहम्मद शेख सरकार बरखास्त केलं. राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. यानंतर काँग्रेसनं फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी केली. 1987 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांनी मिळून नवी आघाडी स्थापन केली. यामध्ये जमात-ए-इस्लामी आणि इत्तेहादुल-उल-मुस्लिमीन यांसारख्या पक्षांनी एकत्र येऊन मुस्लिम युनायटेड फ्रंट (MUF) ची स्थापना केली. यासिन मलिकनं या आघाडीचे उमेदवार मोहम्मद युसूफ शाह यांचा प्रचार केला. नंतर याच युसूफ शाहनं हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना स्थापन केली. आज युसूफ शाह हे सय्यद सलाहुद्दीन या नावानं ओळखलं जातात.काश्मीरमध्ये हिंसक घटना वाढल्या : 1987 मध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंट (MUF) काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून निवडणुकीत पराभूत झाला. यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हिंसक घटना वाढल्या. यासीन मलिकनं काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं जातं. 1988 मध्ये यासिन मलिक जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाला. तो एरिया कमांडर होता. याद्वारे यासिन मलिकनं काश्मिरी तरुणांना देशाविरुद्ध भडकावण्यास सुरुवात केली.
गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण : 1988 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी तो पाकिस्तानला गेला. इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो 1989 मध्ये भारतात परतला. यानंतर त्यानं गैर-मुस्लिमांना मारण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1989 रोजी देशाचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचं अपहरण करण्यात आलं. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक घेत होते. अशफाक वाणी हा या अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता. यासीन मलिकच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं. यातील सर्व दहशतवादी जेकेएलएफशी संबंधित होते. टाडा न्यायालयानं यासीन मलिक, अशफाक वाणी, जावेद मीर, मोहम्मद सलीम, याकूब पंडित आणि अमानतुल्ला खान यांना या प्रकरणी आरोपी ठरवलं आहे. अशफाक वाणी याचा 1990 मध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर 1990 मध्ये काश्मीरमध्ये चार हवाई दलाच्या जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात यासीन मलिकलाही आरोपी करण्यात आलं होतं.यासिनला कधी अटक करण्यात आली?
यासिन मलिकला ऑगस्ट 1990 मध्ये दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जखमी झाला. त्याच्या अटकेनंतर जेकेएलएफचे अनेक दहशतवादी सुरक्षा दलांनी मारलं. मे 1994 मध्ये त्यांची सुटका झाली.
1999 मध्ये यासिन मलिकला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर तो तुरुंगात ये-जा करत राहिला. यादरम्यान त्यांनी देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेतली. 2005 मध्ये त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली होती.
2017 मध्ये एनआयएनं यासिन मलिकवर टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासिन मलिकला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. 19 मे 2022 रोजी कोर्टानं यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवलं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.