Why are there different glasses for different liquors like whiskey wine scotch and beer check details here
मागच्या दहा एक वर्षांपूर्वी घरात काचेच्या ग्लासचे सेट्स फारसे वापरले जायचे नाहीत आणि वापरले तरी एकच सेट. पाहुण्यांना पाणी देण्यापासून ते सरबतापर्यंत एकच सेट. पण, आताच्या मॉर्डन जगात अनेक घरांमध्ये बार युनिट असतं. या बार युनिटची शोभा वाढवायची असेल तर उत्तमोत्तम ग्लासेस असायलाच हवेत. व्हिस्की, वाइन, शॉट्स, मॉकटेल्स आणि ज्युस असे प्रकार बदलले की ग्लास पण बदलतात.
यातला ग्लासचा पहिला प्रकार आहे रॉक्स ग्लास..
व्हिस्की प्रेमींमध्ये हा ग्लासचा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे. रॉक्स टम्बलर अगदी जुन्या पद्धतीचा ग्लास असतो. बारपासून पबपर्यंत बऱ्याच ठिकाणी हा ग्लास पाहायला मिळतोच. या ग्लासचा तळ खूप जाड असतो. हा तळ जाड असतो कारण व्हिस्की उष्ण असते. तीच तापमान बदललं की तिची चवही बदलते. या चवीत बदल होऊ नये म्हणून या ग्लासचा तळ जाड ठेवला जातो.
आपल्याकडे ऑन द रॉक्स असं म्हणण्याची एक पद्धत आहे. म्हणजे काय तर या ग्लासात बर्फाचे खडे टाकून फक्त व्हिस्की ओतली जाते. पण हल्ली व्हिस्की मध्ये पाणी ओतून प्यायची प्रथाच पडली आहे. पण व्हिस्की ही नेहमीच कोरडी पिली जाते.हायबॉल ग्लास..
हे टंबलर ग्लासपेक्षा उंच असा ग्लास म्हणजे हायबॉल ग्लास. त्याचा तळही टंबलर ग्लाससारखा जाड असतो. भारतासह संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या व्हिस्की कॉकटेलला हायबॉल म्हणतात. यामध्ये व्हिस्की, सोडा आणि पाण्यासोबत सर्व्ह केली जाते. या कॉकटेलवरून हायबॉल असं या ग्लासचं नाव पडलं. या ग्लासच्या लांबट आकारामुळे विविध प्रकारचे कॉकटेल देण्यासाठी वापरला जातो. ग्लेनकेर्न ग्लास...
जर व्हिस्कीचा रंग आणि चव समजून घ्यायची असेल तर ग्लेनकेर्न ग्लासशिवाय तुम्हाला पर्याय नाही. या ग्लासमध्ये एखादं ड्रिंक ओतून ते गोल गोल फिरवलं जातं. त्यानंतर ड्रिंकमध्ये असलेले फ्लेवर्स समजून घेण्यासाठी हा ग्लास नाकाजवळ नेला जातो. त्यामुळे त्याला नोजिंग ग्लास असंही म्हणतात. या ग्लासचा वरचा भाग थोडा पातळ, मधला भाग रुंद आणि खालचा भाग पुन्हा पातळ असा असतो. कोपीता ग्लास...
हा स्पॅनिश ग्लास आहे. लोकल वाईनप्रेमी मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतात. तज्ञांच्या मते सिंगल माल्ट व्हिस्कीचा आनंद घेण्यासाठी या प्रकारचा ग्लास वापरला जातो. आज जगभरातील वाइन टेस्टर्स आणि मास्टर ब्लेंडर्स देखील हा ग्लास वापरतात.
या कोपीता ग्लासला ट्यूलिप ग्लास असं देखील म्हटलं जातं. या ग्लासचा वरचा भाग काहीसा ग्लेनकेर्न ग्लाससारखाच असतो. फरक एवढाच आहे की कोपिता ग्लासच्या तळ एखाद्या फांदीसारखा लांबलचक आणि निमुळता असतो. आपले हात उष्ण असतात आणि हा ग्लास पातळ असतो. आपल्या हाताच्या उष्णतेने ग्लासमधील पेयाच तापमान बदलू नये म्हणून या ग्लासचा रचना केली गेलीय. स्निफ्टर ग्लास..
या ग्लासेसना बलून ग्लास किंवा कॉग्नाक ग्लासेस असंही म्हणतात. व्हिस्कीचा खरा सुगंध अनुभवत त्याचा सिप हळूहळू घेण्यासाठी स्निफ्टर ग्लास एकदम लाजवाब आहे. हा ग्लास खासकरून सिनेमात दाखवला जातो. बऱ्याचदा हॉलिवूडपटांमध्ये हायप्रोफाइल सोसायटीचे लोक एका हातात सिगार आणि एका हातात स्निफ्टर ग्लास घेऊन आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन करताना दिसतात. नॉरलान ग्लास..
या प्रकारचा ग्लास दुहेरी थरांचा असतो. लोकांना महागड्या व्हिस्कीची चव आणि वास त्याच स्वरुपात अनुभवता यावा यासाठी याची रचना करण्यात आल्याचं बरेच मद्यप्रेमी सांगतात. ग्लासच्या वरच्या बाजूला रुंदपणा असल्याने मद्य सांडण्याची भीती नसते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.