Why black smoke comes from the bike? Sakal
जर तुमच्या बाईकमधून काळा धूर येत असेल तर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुमच्या बाईकमधून काळा धूर निघत असेल तर काय काळजी घ्यायला हवी याविषयीच्या काही टिप्स सांगणार आहोत. (Why black smoke comes from the bike?)
1. बाईकमधून काळा धूर येण्याचं मुख्य कारण म्हणजे बाईकमध्ये इंजिन ऑईल कमी असणे 2. जर तुमच्या बाईकमधून काळा धूर निघत असेल तर तुम्ही समजून जा की बाईकमध्ये इंजिन ऑईल कमी आहे. या परिस्थितीत इंजिन ऑईल बदलावे.3. इंजिन ऑईल कमी असतानाही तुम्ही जर गाडी चालवली तर तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये मोठा बिघाड होऊ शकतो आणि मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो. त्यामुळे ही चुकी कधीच करू नका. 4. अनेक लोक इंजिन ऑईल कमी झाल्यावर त्यातच नवं इंजिन ऑईल मिक्स करतात. परंतु असं करणे टाळावे. यानं धूर येणे कमी होण्याऐवजी तो आणखी वाढेल.5. अनेक लोक बाईकचं सर्व्हिसिंग वेळेवर करत नाहीत. त्याचा वाईट परिणाम इंजिनवर होतो.. 6. ठराविक काळानंतर प्रत्येक गाडी काळा धूर सोडू लागते. त्यामुळे प्रत्येक 5-6 महिन्यांच्या अंतराने इंजिनचं सर्व्हिसिंग करायला हवं.7. काही लोक बाईक दीर्घकाळ लगातार गाडी चालवतात. असं करणे शक्य तो टाळावं. त्यातही अशी वेळ आलीच तर बाईक टॉप स्पीडवर न चालवता मध्यम स्पीडने चालवावी.8. गाडीच्या इंजिनालासुद्धा आरामाची गरज असते. त्यामुळे बाईकला थोडी थोडी विश्रांती द्यायला हवी. शक्य झाल्यास सिग्नलवर गाडी उभी असल्यास ती बंद करावी.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.