Dogs follow vehicle Sakal
एखाद्या कुत्र्यानं (Dogs) कधी तुमच्या गाडीचा पाठलाग केलाय का? कधी कधी कुत्रे अचानक आपल्या गाडीचा (Vehicle) पाठलाग करू लागतात आणि आपली त्रेधा उडते. कधी कधी त्यामुळे अपघातही घडतात. असा अनुभव अनेकदा आपल्याला येतो. परंतु आपण कुत्र्याला कधीही काही केले नसताना कुत्रे आपल्या गाडीचा पाठलाग का करतात? यामागची काही कारणं जाणून घेऊया. (Why do dogs follow the car? Find out the reasons)
1. सर्वच कुत्री गाड्यांच्या मागे लागत नाहीत. जर एखादा कुत्रा ठराविक गाडीचा पाठलाग वारंवार करत असेल तर त्यामागे एखादी घटना कारणीभूत असू शकते. या गाडीवरुन आलेल्या व्यक्तीने कुत्र्याला इजा पोहोचवली असेल किंवा तसं चुकून झाले असेल तर कुत्रा ते कायमस्वरुपी लक्षात ठेवतो आणि जेव्हा जेव्हा त्या गाडीचा आवाज येईल तेव्हा त्या गाडीचा पाठलाग करतो.
2. कुत्र्या आपल्या आजुबाजूच्या गोष्टी लक्षात ठेवतो. अशात जर एखादं नवं वाहन आल्याचं जाणवल्यास कुत्रा त्या गाडीचा पाठलाग करतो.
3. कुत्रा हा ठराविक परिसराच्या बाहेर जात नाही आणि त्याला अनोळखी गोष्ट त्याच्या परिसरात आलेली चालत नाही. असं घडल्यास कुत्रा त्या गाडीवर धावून जातो.
4. वाहनांच्या लाईट्स तसेच आवाजांमुळे कुत्रे विचलित होतात. त्यामुळे कुत्र्यांना धोका वाटू लागतो. म्हणूनही कुत्रे अशा वाहनांच्या मागे धावू लागतात.
5. कुत्र्यांना गाडींच्या चाकांचा, ब्रेक तसेच चैन इत्यादी आवाजांमुळे गाडी ही वस्तू धोकादायक आपल्याला धोकादायक ठरू शकते असं वाटते. त्यामुळे कुत्रे बऱ्याचदा त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.
6. अनेकदा कुत्रे दुसरा कुत्रा गाडीचा पाठलाग करतोय म्हणूनही गाडीचा पाठलाग करू लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.