एखाद्यावर प्रेम (Love)करण खूर सोपं असते पण ते निभावणे तितकेच अवघड असते. एखादे नातं तेव्हाच टिकते जेव्हा दोन्ही बाजूने प्रेम असेल. प्रेम जितके सुंदर असते तितकेच ते असह्य देखील असते जेव्हा ब्रेक-अप(Break Up) होते. आजच्या काळात नातं सहज बनतात आणि तितक्याच सहजतेने तुटतातही. त्याच्यामागे अनेक कारणे आहे जे तुम्हाला माहित असली पाहिजे. कित्येकदा असे दिसून येते सुरूवातीच्या काळात नात्यामध्ये खूप प्रेम असते पण काही काळानंतर हळू हळू वाद होऊ लागतात. सतत होणाऱ्या वादांमुळे नाते(Relationship) तुटण्याची वेळ येते. पण तुम्ही हे जाणून घेण्याचा कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की सुरुवातीच्या काळामध्ये ब्रेकअप होण्याची काय कारण असतात. तर मग तुम्हाला ते माहित असले पाहिजे. कित्येकदा नात्यात कमिटमेंट नसल्यामुळे ते तुटते. चला जाणून घेऊ या ब्रेकअप होण्यामागची कारणे...(why People break up in a relationship)
कॉल मेसेज न करणे (Not Calling Or Messaging)
आजच्या काळामध्ये प्रत्येकाला वाटते त्याच्या पार्टनरने वेळ दिला पाहिजे. त्यांना वेळच्या वेळी फोन किंवा मेसेज करावे असे त्यांना वाटत असते. पण तरीही कित्येकदा लोक रिलेशनशीपमध्ये चूका करतात. कित्येकदा लोक आपल्या पार्टनरला तितका वेळ देऊ शकत नाही जितका त्यांना हवा असतो अशा वेळी पार्टनरला वाटते की त्यांना तुमची गरज नाही. अशा वेळा हळू हळू गैरसमज वाढतात आणि भांडण होतात आणि ब्रेकअपची वेळ येते.
जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणे
कित्येकजा नात्यामध्ये जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळे नाते तूटू शकते त्यामुळे भूतकाळामधील चूका पुन्हा पुन्हा करू नका. कित्येकदा असे दिसते की वांरवार जुन्या गोष्टी केल्यामुळे पार्टनरला गिल्टी फिल करुन देतात. त्यामुळे नातें तुटू शकते. वारंवार वाद घालणे (Fight Over Petty Issues)
एखाद्या गोष्टीवर पार्टनरला टोमणे मारणे किंवा कमी लेखणे, रिलेशनशिप खराब करण्याचे एक मोठे करण्याचे कारण ठरू शकते. कित्येकवेळा लोक चूकून ही चूक करतात.वि
विशेषत: भांडणामध्ये असे वागल्यास नात्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुमचा पार्टनरकडे जर खूप पेशन्स असेल तरीही अशा गोष्टी नात्यामध्ये कटूता निर्माण करू शकतात.
पार्टनर पेक्षा जास्त इतर गोष्टींमध्ये लक्ष देणे (Busy With Something More Than A Partner)
कित्येकदा पार्टनरला वेळ देऊ न शकणे तुमच्या नात्यासाठी चूकीचे ठरू शकते. कित्येकदा लोक आपल्या फोन वर बिझी असतात किंवा आपल्या फ्रेन्डसोबत कॉलवर बिझी असतात. अशावेळी आपल्या पार्टनरला वाईट वाटू शकते, जे तुमच्या नात्यासाठी योग्य नसत
प्रत्येक गोष्टीला टोमणे मारणे (Taunt)
कित्येकदा भांडण किंवा कोणत्यातरी गोष्टीवर पार्टनरला टोमणे मारणे नाते खराब करण्याचे कारण ठरू शकते. वारंवार असे केल्यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. जर तुमचा पार्टनरला कोणतेही चूक झाली असेल आणि त्याला त्याच्या चूकीची जाणीव असेल तर वारंवार त्याबाबत टोमणे मारू नये. असे केल्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो आणि पुढे जाऊन ब्रेकअप होऊ शकते.
Ex बाबत बोलणे(Talking About Ex)
कित्येकदा पार्टनरसमोर वारंवार Exचे कौतुक करणे आणि त्यांचा उल्लेख करणे तुमच्या पार्टनरला इरिटेट करू शकते. त्यामुळे शक्य तितक्यावेळा चूका करणे टाळा.
चिटिंग किंवा फसवणूक (Cheating Or Infidelity)
कोणत्याही नात्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते विश्वास. अशात जर एखादा पार्टनर या विश्वास तोडतो आणि बाहेर दुसऱ्या कोणासोबत संबध ठेवतो तेव्हा पार्टनरची फसवणू करतो. जे ब्रेकअपचे कारण मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.