मुलांना (Children) खायला घालणं हे आव्हानापेक्षा कमी नाही. विशेषतः हिवाळ्यात (Winter Season) मुलांना फराळ खायला जास्त आवडतं, परंतु तरीही मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेणं गरजेचं आहे. अशा अनेक आरोग्यदायी गोष्टी आहेत, ज्या हिवाळ्यात मुलांना खायला दिल्या जाऊ शकतात.
रताळं : रताळं लहान मुलांना खूप आवडतात. तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये रताळं तळून ते चीज किंवा पनीरसोबत खायला देऊ शकता.सैल्मन फिश (Salmon Fish) : माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते खाल्ल्यानं मुलांची दृष्टी सुधारते. याशिवाय, मुलांचा मेंदू तीक्ष्ण आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.अंडी (Eggs) : तुम्ही उकडलेलं अंडीही मुलांना खायला द्यावी. विशेषत: वाढत्या मुलांना अंडी खायला द्या, यामुळं त्यांची वाढ चांगली होते.बाजरीची रोटी : बाजरीची रोटी मुलांना खायला द्या. गव्हाच्या भाकरीपेक्षा बाजरीत जास्त पोषक असतात. बाजरीची रोटी दही किंवा लोणच्यासोबत खायला देऊ शकता. बाजरीमध्ये प्रथिनं, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.दूध (Milk) : लहान मुलांना नेहमी गरम दूध द्यावं. कोमट दूध प्यायल्यानं बाळांना चांगली झोप लागते. तसेच मूल दूध पीत नसेल, तर त्यात दोन बदाम बारीक करून किंवा चॉकलेट (Chocolate) टाकून मुलाला कोमट दूध द्यावं.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.