थंडीच्या दिवसात स्कीन ड्राय तसेच रफ होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. हिवाळा सुरू झाला की, त्वचा काळी पडू लागते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा काळी का होते आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे.
हिवाळ्यात त्वचा काळी पडण्याची कारणे-
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त काळी होते. खरं तर, हिवाळ्यात त्वचेची काळजी न घेतल्याने त्वचा कोरडी आणि ड्राय होते, त्यामुळे त्वचा काळी दिसते.मॉइश्चरायझर लावा- हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे स्कीन फाटते. त्यामुळे त्वचा काळी पडू लागते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.पाणी प्या- हिवाळ्यात लोक पाणी पिणे खूप कमी करतात. त्यामुळे शरीरातील डिहायड्रेशन वाढते आणि त्वचा काळी दिसू लागते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात अधिकाधिक पाणी प्या.सनस्क्रीन लावा- हिवाळ्यात लोक सनस्क्रीन वापरत नाहीत, त्यामुळे त्वचा काळी पडते. हिवाळ्यात, लोकांना बऱ्याचदा उन्हात उभे राहणे आवडते. हिवाळ्यातील उन्हामुळेही त्वचा काळवंडते. या हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन क्रीम जरूर लावा.जास्त गरम पदार्थांचे सेवन करू नका- हिवाळ्यात लोक चहा-कॉफीचे भरपूर सेवन करतात. त्यामुळे त्वचा आतून खराब होते. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळे त्वचा डिहायड्रेड होते. त्वचा तजेलदार होण्यासाठी चहा-कॉफी नव्हे तर अधिकाधिक पाणी प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.