Womens Day 2023 : दरवेळी तिच्या वाटेवरचा संघर्ष हा कठीण होताना दिसतो, आपण कितीही म्हणत असलो तरी अजुनही काही गोष्टी बदलायला वेळ जाऊ द्यावा लागेल. जगभरातील वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून महिलांविषयीच्या आगळ्या वेगळ्या विषयांचा शोध घेऊन तयार केलेल्या चित्रपटांना साऱ्या जगानं डोक्यावर घेतले. महिला दिनाच्या निमित्तानं आपण अशा दहा चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.
Ammu - अमू
तरुण स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे अमूकडे पाहिल्यावर कळते. अमूचं लग्न झालं आहे. तिनं तिच्या नव्या आयुष्याला सुरुवातही केली आहे. मात्र तिच्या आयुष्यात आणखी भलतंच काही वाढून ठेवलं आहे. अमू आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो.
Archana 31 not out - अर्चना ३१ नॉट आऊट
महिलांवर आधारित अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील पण अर्चना नॉट आऊटची गोष्टच वेगळी आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याचा विषय हाच मुळी अनेकांच्या कौतूकाचा विषय होता. ग्रामीण मल्याळम भागातील महिलेची कथा चित्रपटामध्ये मांडण्यात आली होती.
Archana 31 not out - अर्चना ३१ नॉट आऊट
महिलांवर आधारित अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील पण अर्चना नॉट आऊटची गोष्टच वेगळी आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याचा विषय हाच मुळी अनेकांच्या कौतूकाचा विषय होता. ग्रामीण मल्याळम भागातील महिलेची कथा चित्रपटामध्ये मांडण्यात आली होती.
Eat. Pray. Love - इट प्रे लव्ह
ज्युलिया रॉबर्टस च्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ज्युलियानं त्यात लिझ गिल्बार्टची भूमिका साकारली होती. पुढे कित्येक वर्षे तिला त्याच नावानं चाहते ओळखू लागली. लिझनं ज्याप्रकारे सारे नियम मोडत स्वताची वाट निर्माण केली त्याचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.
How old are you? (2014) - हाऊ ओल्ड आर यू...
निरुपमानं वयाची ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र अजुनही तिच्या वाटेचा संघर्ष काही संपलेला नाही. वाढतं वय हे किती वेगवेगळ्या संघर्षासाठी कारणीभूत ठरतं हे हाऊ ओल्ड आर युच्या निमित्तानं दिसून येते.
Magalir Mattum (1994)- मगालिर मुथुत्म
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंगिथत्म श्रीनिवास राव यांनी केले होते. लैंगिक अत्याचारासारख्या विषयावर तमिळ चित्रपटानं वाचा फोडून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. समीक्षक, अभ्यासकांचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
English Vinglish - इंग्लिश विंग्लिश
दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटानं प्रेक्षकांना श्रीदेवी या अभिनेत्रीचा वेगळा चेहरा समोर आला होता. श्रीदेवीनं यापूर्वी केलेल्या भूमिका आणि या चित्रपटातील तिची भूमिका यात खूप फरक होता. इंग्लिश विंग्लिशचा विषयही हटके होता. प्रेक्षकांना तो खूप भावला. त्याचे खूप कौतूकही झाले.
Jaya Jaya Jaya Jaya Hey - जया जया जया जया है
जयाच्या धाडसीपणाचं कौतूक करावं तेवढं कमी आहे. तिनं आपल्याला सतत त्रास देणाऱ्या नवऱ्याला जो कायमचा धडा शिकवला तो दिग्दर्शकानं विनोदाच्या आधारे मांडला आहे त्याला तोड नाही. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. त्याचे खूप कौतूकही झाले होते.
Thelma & Louise - थेलमा अँड लुझी
दोन महिलांची कथा या चित्रपटातून तितक्याच उत्कटतेनं सादर करण्यात आली आहे. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं जगभरामध्ये वाहवा मिळवली होती. त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर कौतूकही झाले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले होते.
Queen - क्विन
बॉलीवूडमध्ये कंगनाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. कंगनानं राणीची भूमिका मोठ्या प्रभावीपणे या चित्रपटामध्ये वठवली होती. लग्न मोडलेल्या महिलेकडे कशाप्रकारे पाहिले जाते,महिला एकटी राहू शकत नाहीका, तिला समाज स्वतंत्रपणे विचार करु देऊ शकत नाही का, अशा प्रतिक्रिया या चित्रपटाच्या निमित्तानं समोर आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.