World Animal Protection Day esakal
नाशिक : ‘पाण्यांचे संरक्षण करा’, ‘पर्यावरणाचे संरक्षण करा’, ‘प्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे आपण नेहमीच ऐकत असतो. शासन-प्रशासन सुद्धा कागदोपत्री या गोष्टींचे अनुसरण करते. वन्यप्राणी असो अथवा रस्त्यांवर वास्तव्य करणारे प्राणी त्यांना कायद्याने संरक्षण प्राप्त आहे. पशुपक्ष्यांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. याची जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणूनच ‘जागतिक प्राणी सुरक्षा दिन’ जगभर साजरा केला जातो.
पशुपक्ष्यांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. याची जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणूनच ‘जागतिक प्राणी सुरक्षा दिन’ जगभर साजरा केला जातो.1931 साली इटली येथे इंटरनॅशनल ॲनिमल प्रोटेक्शन काँग्रेस भरवण्यात आली होती. त्यामध्ये संत फ्रान्सिस यांचा सन्मान म्हणून 4 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय प्राणी दिवस साजरा करण्याचं ठरवलं. पाळीव प्राणी तसेच इतरही प्राण्यांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे.जागतिक प्राणी दिनाचा मूळ उद्देश हा जगभरातील प्राण्यांच्या परिस्थितीवर आवाज उठवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणे, त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. वन्यप्राणी असो अथवा रस्त्यांवर वास्तव्य करणारे प्राणी त्यांना कायद्याने संरक्षण प्राप्त आहे.जगभरातले सर्व प्राणी, म्हणजे पाळीव प्राणी आणि जंगलातले प्राणी, या सर्वांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचाही आज सन्मान केला जातो.प्राणी हे निसर्गातील अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहेत. आजही जगभरातल्या जवळपास एक अब्ज गरीब लोकांना प्राण्यांमुळे रोजगार मिळतोय. त्यामुळे शाश्वत विकासासाठी प्राण्याची काळजी घेणे, त्यांचं संवर्धन करणे आवश्यक आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.