हृदय रोगांमुळे दरवर्षी कित्येकजणांचे जीव जातात. याची सामान्य लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात आणि पुढे जाऊन हे धोकायदाक ठरू शकते. हृदयाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस वल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो. हृदय रोगाची प्रमुख 9 लक्षणांबाबत जाणून घेऊ या..
छातीत दुखणे :
कित्येकवेळा तुम्ही आणि तुमचे आईवडील छातीत होणाऱ्या दुखण्याला गॅस आणि अॅसिडिटी समजून दुर्लक्षित करतात. छातीमध्ये दुखत असे किंवा दबाव जाणवत असेल तर हे हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते. त्याशिवाय ऑर्टरीमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे देखील छातीतमध्ये वेदना जाणवू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीमध्ये न दुखताच हृदयविकाराचा झटका आल्याचे खूप कमी केसमध्ये आढळले आहे. घसा-जबड्यामध्ये वेदना जाणवणे :
जेव्हा छातीमध्ये वेदना सुरु होतात तेव्हा या वेदना गळा आणि जबड्यापर्यंत जाणवतात. असे जाणविल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचे प्राथमिक लक्षण आहे. खूप घाम येणे :
कोणतेही वर्कआऊट न करता किंवा काम न करताच जास्त घाम येत असेल तर हे हृदय रोगाचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदयामध्ये रक्त व्यवस्थित पुरवठा होऊ शकत नाही तेव्हा विना कारण खूप घाम येतो. जर हे लक्षण दिसल्यास निष्काळजीपणा न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.चक्कर येणे :
चक्कर आणि डोळ्यांप्रमाणे अंधारी येणे हे कमी रक्तदाबाचे लक्षण असू शकते. तुम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना असे लक्षण दिसत असल्यास तातडीन डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावे. कमी रक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताचे प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे रक्ताचा प्रवाह हृदयापर्यंत नीट पोहचत नसेल तरस हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवू शकतो.उल्टी, मळमळ किंवा गॅस :
मळमळ, आणि उल्टी येत असल्यासारखे वाटणे देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे प्राथमिक लक्षण असू शकते जर तुम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना असे लक्षण आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.पायांवर सूज येणे :
पायांवर किंवा घोट्यांवर सुज येण्याचे कारण हृदयविकाराशी संबधीत असू शकते. कित्येकवेळा हृदयमध्ये रक्तभिसारण नीट होत असेल तर पायावर, घोट्यावर किंवा तळव्यावर सूज येऊ शकते.उच्च रक्तदाब : आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये कॉमन झाली आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी या रोगाचा धोका वाढू शकतो. तुम्ही तुमच्या आई-वडिलांची दर आठवड्याला, किंवा 15 दिवसांमध्ये डिजीटल ब्लड प्रेशर मोजण्याच्या मशीन द्वारे रक्तदाब मोजू शकता. जर तुमचे आईवडीलांना उच्च रक्तदाब असेल तर त्यांचे नियमित तपासणी केली पाहिजे. अनियंत्रित उच्च रक्तदाब तुमच्या हद्याला कठोर बनवू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. मधुमेह (हाय ब्लड शुगर) :
हाय ब्लड शुगरमुळे हृद्य रक्तवाहिन्यांचे विकाराचा धोका वाढवू शकतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने हृद्यातील रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळ रक्तवाहिन्यांममध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखरेची पातळी तपासून घेणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. हाय कॉलेस्टॉल :
कोलेस्टेरॉल हा शरीराच्या प्रत्येक पेशीत आढळणारा पदार्थ आहे. रक्तामध्ये कोलेस्टॉलचे प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. नियमित कॉलेस्ट्रॉलची पातळीची करा आणि तुमच्या डाएटमध्ये संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि फळे समावेश करा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.