दरवर्षी 19 ऑगस्टला वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो. जाणून घेऊयात यंदाची थीम आणि जगातील पहिल्या सेल्फीबद्दल...
'वर्ल्ड फोटोग्राफी डे' चा इतिहास: सर्वांत पहिल्यांदा फ्रान्सने हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. त्यानंतर जगभरात त्याला मान्यता मिळून आज सर्व जग फोटोग्राफर्स डे साजरा करत आहे.1837 मध्ये फ्रेंचमन लुईस डॅगेरे आणि जोसेफ नाईसफोर यांनी विकसित केलेले 'डेगेरिओटाईप' हे फोटोग्राफी टेक्निक जगाला कळावेत यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला. फ्रेंच सरकारने 9 जानेवारी 1839 मध्ये या टेक्निकसाठी पेटंट नोंदवले व फोटोग्राफर्स डे दिवस सुरू करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 19 ऑगस्ट 1839 मध्ये जागतिक फोटोग्राफी डे सुरू झाला. जगातिल पहिला सेल्फी: फोटोग्राफरची आवड असणारे अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी जगातील पहिला सेल्फी काढला होता. त्यांनी हा सेल्फी 1839 मध्ये काढला होता. हा सेल्फी यूनाइटेड स्टेट लाइब्रेरी ऑफ कांग्रेस प्रिंटमध्ये उपलब्ध आहे.काय असणार आहे यावर्षीची थीम?: 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' च्या वेबसाईटनुसार #WorldPhotographyDay चे 10 लाख टॅग्स तयार करण्याची योजना करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या नावाचे 6 लाख टॅग तयार झाले आहेत. आयोजकांचे असे मतं आहे की, हा टॅग वापरून तुम्ही काढलेला एखादा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करा. त्याचबरोबर या हॅशटॅगसोबत जे फोटो शेअर केले असतील त्यांना लाइक आणि शेअर करा.कोरोना काळात साजरा होणारा हा दुसरा वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. त्यामुळे यावर्षीची थीम ही Pandemic lockdown through the lens म्हणजेच 'कॅमेराच्या लेन्समधून लॉकडाऊन आणि माहामारी' अशी आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.