पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे ट्विटरचे (Twitter) सीईओ झाल्यापासून जगभरातील टेक कंपन्यांमध्ये भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्याप्रमाणेच जगातील अनेक मोठ्या टेक (Tech) कंपन्यांच्या सीईओ (CEO) भारतीय वंशाच्या महिला आहेत. आज आपण भारतीय वंशाच्या ५ यशस्वी महिलांची ओळख करून घेणार आहोत.
प्रिया लखानी (Priya Lakhani)- भारतीय वंशाच्या प्रिया लखानी या CENTURY Tech च्या संस्थापक आणि CEO आहेत. यूके-केंद्रित सेंच्युरी टेक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण तंत्रज्ञान विकसित करते.
यात शिक्षक, न्यूरोसायंटिस्ट आणि तंत्रज्ञांची एक टीम आहे जी शाळा आणि महाविद्यालयांसाठी AI टूल्स विकसित करतात. प्रिया लखानी यांनी मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग लॉमध्ये एलएलएम केले आहे. याशिवाय त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून मीडिया लॉमध्ये लॉ आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. त्यांनी लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून कायदा आणि अर्थशास्त्रात बीए केले आहे.
अंजली सूद (Anjali Sud)- अमेरिकन व्हिडिओ होस्टिंग आणि शेअरिंग कंपनी Vimeo मध्ये अंजली सूद या सीईओ म्हणून कार्यरत आहेत. २०१४ साली या कंपनीत त्या ग्लोबल मार्केटिंग हेड या पदावर रुजू झाल्या होत्या. ३८ वर्षीय अंजली सूद अमेरिकेतील फ्लिंट (मिशिगन) येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे आई-वडील प्रवासी भारतीय आहेत.
जयश्री उल्लाल (Jayshree Ullal)- अमेरिकन संगणक नेटवर्किंग कंपनी अरिस्ता नेटवर्क्सच्या Arista Networks सीईओ जयश्री उल्लाल यांची २००८ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
त्यापूर्वी त्यांनी AMD, Fairchild Semiconductor आणि Cisco येथे काम केले. त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे तसेच सांता क्लारा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्या आता ६० वर्षांच्या आहेत, त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला, पण त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले.
रेवती अद्वैती (Revathi Advaithi)- फ्लेक्स (Flex) कंपनीच्या सीईओ रेवती अद्वैती भारतात लहानाच्या मोठ्या झाल्या. Flex Ltd. ही यूएस-सिंगापूर-आधारित इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादन करणारी कंपनी आहे.त्या Uber आणि Catalyst.org सारख्या कंपन्यांच्या बोर्डावर संचालक देखील आहेत. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक आणि थंडरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. सुमारे ५५ वर्षांच्या रेवती यांचे वडील ए.एन.स्वामी केमिकल इंजिनिअर होते. भारतात, त्यांचे कुटुंब बिहार, गुजरात, आसाम आणि तामिळनाडू येथे वास्तव्य केले आहे. ५. नीता माधव (Nita Madhav)- Metabiota च्या सीईओ नीता माधव या देखील भारतीय वंशाच्या आहेत. Metabiota जगभरातील संसर्गजन्य रोगांमुळे होणारी आरोग्य आणि आर्थिक जोखीम कमी करण्यात सरकार आणि व्यवसायांना मदत करते. ही कंपनी डेटा सायन्स, अॅनालिटिकल टूल्स इत्यादीद्वारे हे काम करते. नीता माधव यांनी येल विद्यापीठातून इकोलॉजी आणि इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये पदवी आणि एमोरी विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.